स्टार्टअप ईकोसिस्टीममध्ये महाराष्ट्र अव्वल; केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 09:14 AM2022-02-04T09:14:37+5:302022-02-04T09:15:42+5:30

११,३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र अव्वल

Maharashtra tops in startup ecosystem | स्टार्टअप ईकोसिस्टीममध्ये महाराष्ट्र अव्वल; केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

स्टार्टअप ईकोसिस्टीममध्ये महाराष्ट्र अव्वल; केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी

Next

मुंबई : सध्या उद्योग जगतात स्टार्टअप व युनिकाॅर्न परवलीचा शब्द बनला आहे. विशेष म्हणजे यातही महाराष्ट्र आघाडीवर असल्याचे केंद्र सरकारच्या आर्थिक पाहणी अहवालने सिद्ध केले. ११,३०८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्ससह महाराष्ट्र अव्वल आहे, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. 

ज्या कंपनीचे मूल्यांकन ७,५०० कोटी ते ७५ हजार कोटी आहे त्यांना स्टार्टअप युनिकाॅर्न संबोधले जाते. देशभरातील एकूण ४४ पैकी ११ युनिकाॅर्न एकट्या महाराष्ट्रात आहेत. यासंदर्भात मलिक म्हणाले की, राज्यात ३२,६६२ नोंदणीकृत स्टार्टअप असून त्यापैकी ११,७०५ स्टार्टअप हे मान्यताप्राप्त आहेत. देशभरातील मान्यताप्राप्त स्टार्टअप्सची संख्या ६२ हजार आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान ५ ते ७ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. अगदी दुर्गम अशा गडचिरोलीतही ३० नोंदणीकृत आणि ९ मान्यताप्राप्त तर नंदुरबारमध्ये ३२ नोंदणीकृत आणि ११ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत. मुंबई महानगर प्रदेशात १४,७१० नोंदणीकृत तर ५,९३८ मान्यताप्राप्त स्टार्टअप्स आहेत. पुण्यामध्ये ८,६०३ नोंदणीकृत तर ३,३७५ मान्यताप्राप्त, औरंगाबादमध्ये ७७४ नोंदणीकृत तर २२० मान्यताप्राप्त, सिंधुदुर्गमध्ये ३६ नोंदणीकृत तर १४ मान्यताप्राप्त स्टार्टअप आहेत.

साेसायटीच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम 
राज्य सरकारने महाराष्ट्र राज्य नावीन्यपूर्ण स्टार्टअप धोरण जाहीर केले आहे. धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य नावीन्यता  सोसायटी कार्यरत आहे. धोरणाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी या सोसायटीमार्फत विविध योजना, उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात. यात स्टार्टअप वीक, इनक्युबेटर्सची स्थापना, स्टार्टअप आणि नावीन्यपूर्ण यात्रा, ग्रँड चॅलेंज, हॅकॅथॉन अनेक उपक्रमांची राबवले जात आहे. 

महाराष्ट्र राज्य नावीन्यता सोसायटीच्या माध्यमातून राज्यातील अनेक नवउद्योजकांना उद्योजकतेशी निगडीत विविध प्रकारचे साहाय्य व मार्गदर्शन उपलब्ध होत आहे.

Web Title: Maharashtra tops in startup ecosystem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.