महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2017 05:25 AM2017-12-02T05:25:39+5:302017-12-02T05:26:12+5:30

मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग....

  Maharashtra tops list of juvenile delinquency, NCRB report: State number one after Madhya Pradesh | महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

महाराष्ट्रात बालगुन्हेगारीचा चढता आलेख , एनसीआरबीचा अहवाल : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्याचा क्रमांक

Next

- मनीषा म्हात्रे
मुंबई : मध्य प्रदेशपाठोपाठ राज्यातही बालगुन्हेगारी वाढत असल्याचे विदारक वास्तव एनसीआरबीच्या अहवालातून स्पष्ट झाले. यामध्ये निरक्षरबालगुन्हेगारांपेक्षा शिक्षित बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे. किरकोळ स्वरूपाचे गुन्हे घडणे नवीन नाही, मात्र गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांतही खून, दरोडा, घरफोडी, विनयभंग, बलात्कार, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न करणे आदी गुन्ह्यांत बालकांचा समावेश वाढत चालला आहे, ही गंभीर बाब आहे.
एनसीआरबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात बालगुन्हेगारीचे ३५ हजार ८४९ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये मध्य प्रदेश अग्रस्थानी आहे. मध्य प्रदेशमध्ये एकूण ७,३६९ गुन्हे दाखल झाले आहेत. तर त्यापाठोपाठ महाराष्ट्र राज्याचा क्रमांक लागतो. राज्यात एकूण ६ हजार ६०६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये बालगुन्हेगारांकडून झालेल्या हत्येच्या आकडा १३०वर पोहोचला आहे. तर अल्पवयीन मुलांकडून २५८ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. आरोपींमध्ये १२ वर्षांखालील मुलेही आहेत, ही चिंतेची बाब आहे. आतापर्यंत ७,७१२ बालगुन्हेगारांना विविध गुन्ह्यांत ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये प्राथमिक ते १२वी इयत्तेपर्यंत शिकणाºया बालगुन्हेगारांचे प्रमाण अधिक आहे.
अनेक बालगुन्हेगार मौजमजेसाठी पैसे लागत असल्याने गुन्हेगारीकडे वळतात. दिवसभर सुरू असणाºया विविध वाहिन्या, गुन्हेगारी मालिका, स्पर्धात्मक जगामध्ये आपल्याला सगळ्या सुविधा मिळणे ही मानसिकता; तसेच मित्रांची संगत, पालकांचे पुरेसे नियंत्रण नसल्याने मुले चुकीच्या मार्गाकडे वळतात. काही सराईत गुन्हेगार पैशांचे आमिष दाखवून बालकांचा गुन्ह्यांमध्ये वापर करून घेतात. घरातील आर्थिक, कौटुंबिक परिस्थिती तसेच चुकीच्या मित्रांची साथसंगतदेखील मुलांना बालगुन्हेगारीकडे वळण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून येत आहे. केवळ पैशांसाठीच नाही, तर विकृतपणे लैंगिक आकर्षणापोटी अल्पवयीन मुले गुन्हेगारीकडे वळल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पोलिसांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे गरजेचे आहे.

कारवाईतील अडचणी

बालगुन्हेगाराला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात नोंद करून बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात येते. गुन्ह्याचे स्वरूप पाहून त्याची बालसुधारगृहात रवानगी केली जाते. जिल्हा सत्र न्यायालयात बालगुन्हेगारांच्या जामिनासाठी अर्ज करावा लागतो.
कोर्टाच्या परवानगीनंतर त्याला बालसुधारगृहात ठेवायचे अथवा जामिनावर सोडून पालकांच्या ताब्यात द्यायचे, याबाबत गुन्ह्याचे स्वरूप पाहून निर्णय घेण्यात येतो. यानंतर बालसुधारगृहातील बाल न्याय मंडळापुढे त्याची केस सुरू होते. त्यानंतर साक्षीपुरावे पाहून बाल न्याय मंडळ त्यावर निर्णय घेते.
पकडलेल्या बालगुन्हेगाराला अटक करता येत नाही. त्याला कारागृहात अथवा लॉकअपमध्ये ठेवता येत नाही. खाकी वर्दीची दहशत बसू नये म्हणून साध्या वेशातील कर्मचारी चौकशीसाठी येतात. त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्याला ताब्यात घ्यायचे ठरले तर बाल न्याय मंडळाला अर्ज करावा लागतो. 
 

शैक्षणिक वर्गीकरणानुसार

शिक्षण    अटक बालगुन्हेगार    
निरक्षर    ४२०
प्राथमिक शिक्षण    २७६४
दहावी नापास    ४१२९
१२वी पास    ३९९




 

 

Web Title:   Maharashtra tops list of juvenile delinquency, NCRB report: State number one after Madhya Pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.