कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

By admin | Published: September 13, 2016 05:59 AM2016-09-13T05:59:20+5:302016-09-13T05:59:20+5:30

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या भेटीत याबाबत प्रशंसा केली.

Maharashtra tops in skill development | कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

कौशल्य विकासामध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Next

मुंबई : कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीवप्रताप रुडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच्या भेटीत याबाबत प्रशंसा केली.
कौशल्य विकासाचे कार्यक्रम उत्तमरीत्या राबविणाऱ्या दहा राज्यांमध्ये महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. २०१५-१६ या वर्षात महाराष्ट्रात दोन लाख लोकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यात आले.
राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये चालक प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येकी पाच ते सात एकर
जागा निश्चित करण्याबाबत या वेळी फडणवीस आणि रुडी यांच्यात चर्चा झाली. कौशल्य विकास मंत्रालय आणि भृपृष्ठ वाहतूक विभागाच्या संयुक्त सहभागाने या संस्था सुरू करण्यात येतील. पंतप्रधान कौशल्य विकास योजनेंतर्गत प्रशिक्षण केंद्र उभारण्यासाठी बंद पडलेल्या महापालिका शाळांचा उपयोग करून घेण्याचा प्रस्ताव असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Maharashtra tops in skill development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.