पर्यटन क्षमतेत महाराष्ट्र अव्वल

By Admin | Published: October 8, 2015 03:18 AM2015-10-08T03:18:12+5:302015-10-08T03:18:12+5:30

संपन्न निसर्गाने नटलेल्या महाराष्ट्र राज्याला देशातील तसेच परदेशातील पर्यटकांनी नेहमती भरभरून पसंती मिळते. परंतु, पर्यटनाच्या या पसंतीसाठी राज्यात उभारलेल्या

Maharashtra tops in tourism capability | पर्यटन क्षमतेत महाराष्ट्र अव्वल

पर्यटन क्षमतेत महाराष्ट्र अव्वल

googlenewsNext

मुंबई: संपन्न निसर्गाने नटलेल्या महाराष्ट्र राज्याला देशातील तसेच परदेशातील पर्यटकांनी नेहमती भरभरून पसंती मिळते. परंतु, पर्यटनाच्या या पसंतीसाठी राज्यात उभारलेल्या पायाभूत सुविधांमुळे मोठ्या प्रमाणावर विकास झाला असून यामुळेच पर्यटनच्या क्षमतेत महाराष्ट्र अव्वल असल्याचे नुकत्याच झालेल्या एका पाहणीत दिसून आले आहे.
एचव्हीएसच्या आणि वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल तसेच इंडिया इनिशीएटीव्हने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणातून महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून आले आहे. ३० राज्यांतील पर्यटनाच्या सुविधा, पायाभूत सेवा यांची पाहणी करणयत आली. या घटकांसोबतच पर्यटकांच्या भेटी, सकल राष्ट्रीय उत्पन्न/ जीएसडीपी, प्रभावी मार्केटिंग कँपेन आणि हवाईमार्गांची जोडणी या चार मुद्यांवर महाराष्ट्र अव्वल असल्याचे दिसून आले आहे.

Web Title: Maharashtra tops in tourism capability

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.