Maharashtra Unlock: राज्य सरकारचा मोठा निर्णय; हॉटेल्स-रेस्टॉरंट्स रात्री 12 आणि दुकाने 11 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 04:05 PM2021-10-19T16:05:19+5:302021-10-19T16:08:05+5:30
राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार.
मुंबई: कोरोना रुग्णांची संख्या हळुहळू कमी होत आहेत. यामुळेच आता राज्यातील कोरोना नियमांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्रीव सरकारने शाळा, महाविद्यालये सुरू करण्याची परवानगी दिली होती. आता हॉटेल्स, रेस्टॉरंट्स यांना सुरु ठेवण्याची वेळ सरकारने वाढवली आहे. राज्यातील सर्व उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहेत. याशिवाय, इतर सर्व प्रकारची दुकाने रात्री अकरा वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे.
Restaurants & eateries can now remain open till 12 midnight, while shops and establishments can stay open till 11 pm with immediate effect. pic.twitter.com/HqPXctl620
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 19, 2021
राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने हळूहळू सर्व निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. 22 ऑक्टोबरपासून राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर उपाहारगृहे आणि दुकाने यांची वेळ वाढवून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली. यापूर्वीच 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे, नाट्यगृहे यांना सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यानंत आता उपाहारगृहे व दुकानांनाही वेळा वाढवून देण्यात आल्या आहेत.