Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2021 09:12 AM2021-06-05T09:12:11+5:302021-06-05T12:18:48+5:30

Maharashtra Unlock Updates: शुक्रवारी मध्यरात्री मुख्यमंत्री कार्यालयाकडून अनलॉकचं नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार राज्यात ७ जूनपासून अनलॉकला सुरूवात होणार आहे.

Maharashtra Unlock: What will continue in your district from Monday 7 June? know about | Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

Maharashtra Unlock: सोमवारपासून तुमच्या जिल्ह्यात काय सुरू राहणार अन् काय बंद? जाणून घ्या एका क्लिकवर

googlenewsNext

 मुंबई – कोरोना रुग्णसंख्येत घट होत असल्याने महाराष्ट्रात आता अनलॉकच्या प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. राज्यात ५ टप्प्यात अनलॉक केलं जाणार असून यामुळे नागरिक आणि व्यापारांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या ७ जूनपासून म्हणजे सोमवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने मध्यरात्री याबाबत नोटिफिकेशन जारी केले आहे.

कसे असणार हे ५ टप्पे आणि त्यात काय सुरू अन् काय बंद राहणार जाणून घ्या

क्रमांककामेपहिला टप्पादुसरा टप्पातिसरा टप्पाचौथा टप्पापाचवा टप्पा 
अत्यावश्यक दुकानं नेहमीप्रमाणे सुरू राहतीलनेहमीप्रमाणे सुरू राहतीलसंध्याकाळी ४ वाजेपर्यंतसंध्याकाळी ४ वाजेपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत, विकेंडच्या दिवशी बंद 
अत्यावश्यक नसलेली दुकानं नेहमीप्रमाणे सुरू राहतीलनेहमीप्रमाणे सुरू राहतीलसोम ते शुक्र ४ वाजेपर्यंतबंद बंद 
मॉल, थिअटर्स, नाट्यगृहनेहमीप्रमाणे सुरू राहतील५० टक्के क्षमतेनेबंद बंद बंद 
रेस्टॉरंटनेहमीप्रमाणे सुरू राहतील५० टक्के क्षमतेनेसंध्याकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, त्यानंतर घरपोच सेवाटेक अ वे आणि होम डिलिव्हरी फक्त होम डिलिव्हरी 
५ लोकल ट्रेन नेहमीप्रमाणे, परंतु स्थानिक प्राधिकरण निर्बंध लावू शकतातकेवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांना प्रवासाची सवलतकेवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, महिला यांना प्रवासाची सवलतकेवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीकेवळ आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी
६ सार्वजनिक जागा, खुली मैदानं, वॉकिंग, सायकलिंगनेहमीप्रमाणेनेहमीप्रमाणेदरदिवशी पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंत सोम ते शुक्र पहाटे ५ ते ९ वाजेपर्यंतबंद 
खासगी कार्यालये१०० टक्के१०० टक्के५० टक्के उपस्थितीत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत२५ टक्के उपस्थितीत काही कार्यालयांना सूट१५ टक्के उपस्थितीत काही कार्यालयांना सूट 
८ क्रिडानेहमीप्रमाणे सुरू राहतीलपहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ काळात इनडोअर गेम्स, आऊटडोर गेम्स नेहमीप्रमाणे सुरू राहतीलपहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्ससाठी परवानगीपहाटे ५ ते ९ आणि संध्याकाळी ५ ते ९ पर्यंत आऊटडोर गेम्स फक्त सोम ते शुक्र कालावधीतबंद 
९ सांस्कृतिक कार्यक्रम, समारंभ नेहमीप्रमाणे सुरू राहतील५० टक्के उपस्थितीत ५० टक्के उपस्थितीत केवळ सोम ते शुक्रपर्यंत संध्याकाळी ४ वाजेपर्यंत करता येतीलबंद बंद 
१० लग्न समारंभनेहमीप्रमाणे सुरू राहतील५० टक्के क्षमतेने कमाल १०० जणांच्या उपस्थितीत५० जण२५ जण केवळ कुटुंबियांसाठी
११अंत्ययात्रा निर्बंध नाहीतनिर्बंध नाहीत २० जणांची उपस्थिती२० जणांची उपस्थिती२० जणांची उपस्थिती 
१२ स्थानिक बैठका, निवडणूक कार्यक्रमनेहमीप्रमाणे सुरू राहतील५० टक्के उपस्थितीत ५० टक्के उपस्थितीत ५० टक्के उपस्थितीत फक्त ऑनलाईन
१३बांधकामनेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतीलफक्त ४ वाजेपर्यंत बांधकाम ठिकाणी मजुरांना परवानगीबांधकामठिकाणी मजुरांना परवानगी महत्त्वाच्या बांधकामाला परवानगी 
१४ई कॉमर्स व्यवहारनेहमीप्रमाणे सुरू राहतील नेहमीप्रमाणे सुरू राहतीलनेहमीप्रमाणे सुरू राहतीलफक्त अत्यावश्यकफक्त अत्यावश्यक
१५ जीम, सलून, ब्यूटी पार्लरनेहमीप्रमाणे सुरू राहतील ५० टक्के क्षमतेने ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, एसी बंद४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने, केवळ लस घेतलेल्यांसाठीबंद 
१६सार्वजनिक वाहतूक नेहमीप्रमाणे सुरू राहतील१०० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई१०० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई५० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई५० टक्के क्षमतेने परंतु उभं राहून प्रवास करण्यास मनाई
१७ आंतरजिल्हा प्रवासनेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारकनेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारकनेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारकनेहमीप्रमाणे परंतु ५ टप्प्यातील नागरिकांसाठी प्रवास करणं ई पास असणं बंधनकारकई पास असणं बंधनकारक, केवळ अत्यावश्यक कामांसाठी 

 

५ टप्प्यांचे निकष

पहिल्या टप्प्यात – ५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत

दुसऱ्या टप्प्यात – ५ टक्के पॉझिटिव्हीटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांमध्ये ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत

तिसऱ्या टप्प्यात – ५ ते १० टक्क्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ४० टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले असावेत

चौथ्या टप्प्यात –  १० ते २० टक्क्यांमध्ये पॉझिटिव्हीटी रेट आणि ६० टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले

पाचव्या टप्प्यात – २० टक्क्याहून अधिक पॉझिटिव्हीटी रेट आणि ७५ टक्क्यापेक्षा जास्त ऑक्सिजन बेड्स व्यापलेले

वाचा तुमचा जिल्हा कोणत्या टप्प्यात?

पहिला टप्पा – अहमदनगर, चंद्रपूर, धुळे, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, यवतमाळ

दुसरा टप्पा – नंदूरबार, हिंगोली,

तिसरा टप्पा – अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, गडचिरोली, मुंबई, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम

चौथ्या टप्पा – बुलढाणा, कोल्हापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग

पाचवा टप्पा – एकाही जिल्ह्याचा समावेश नाही, परंतु पॉझिटिव्हीटी रेट २० टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर तुमचा जिल्हा रेड झोनमध्ये येऊ शकतो.

Web Title: Maharashtra Unlock: What will continue in your district from Monday 7 June? know about

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.