Maharashtra Vidhan Parishad Election:'कोणी जरी पावसात भिजला तरी त्याचा परिणाम होणार नाही', गोपीचंद पडळकरांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 02:22 PM2022-06-20T14:22:26+5:302022-06-20T14:24:35+5:30

Maharashtra Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra Vidhan Parishad Election: MLC Gopichand Padalkar slams Mahavikas Aghadi over MLC election | Maharashtra Vidhan Parishad Election:'कोणी जरी पावसात भिजला तरी त्याचा परिणाम होणार नाही', गोपीचंद पडळकरांचा टोला

Maharashtra Vidhan Parishad Election:'कोणी जरी पावसात भिजला तरी त्याचा परिणाम होणार नाही', गोपीचंद पडळकरांचा टोला

googlenewsNext

Maharashtra Vidhan Parishad Election: राज्याच्या विधान परिषदेच्या दहा जागांची आज निवडणूक होत आहे. दहावी जागा महाविकास आघाडीच्या खात्यात जाणार की, भाजपच्या हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. दरम्यान, आज सकाळपासूनच सत्ताधारी आणि विरोधी नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज सरकारवर जोरदार निशाणा साधला.

'कोणी कितीही पावसात भिजा...'
विधान भवनाच्या आवारात माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना पडळकर यांनी आजच्या मतदानावर भाष्य केले. तसेच, यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. "कोणी कितीही पावसात भिजले, तरी त्याचा परिणाम होईल असं आज वाटत नाही. भारतीय जनता पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारा आहे. 2019ला राज्यातील जनतेने भाजप-सेना युतीचे 161 आमदार निवडून दिले होते. पण, विश्वासघात झाला. पाठीत खंजीर खुपसून यांनी सरकार स्थापन केले. पण, आता आमदारांना आपले मत व्यक्त करण्याची संधी मिळाली आहे," अस पडळकर म्हणाले.


'यांनी अपक्षांचा अपमान केला'
पडळकर पुढे म्हणाले की, "गेल्यावेळी यांनी राज्यातील अपक्ष आमदारांची किती अब्रू घालवली. अपक्ष आमदारही लोकांमधू निवडून आलेले आहेत. यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले. लोकांनी आमदारांना निवडून दिले, त्यांच्या मनात आपल्या आमदाराविषयी मत कलुशीत करण्याचे काम यांनी केले. त्यामुळे हे सगळे आमदार आज व्यक्त होतील. येत्या चार तासात भाऊ जाणार की, भाई जाणार, हे कळेलचं. 170 आमदार असलेली महाविकास आघाडी सकाळपर्यंत मिटींग घेत होते, हे रात्रभर जागे होते. यातूनच त्यांचा गोंधळ उडाला आहे, हे लक्षात येत आहे," असा टोलाही पडळकरांनी लगावला.

विधान परिषदेची कोणाला उमेदवारी?
शिवसेनेकडून सचिन अहीर, आमशा पाडवी रिंगणात आहेत. तर भाजपाकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे, श्रीकांत भारतीय, उपा खापरे आणि प्रसाद लाड असे पाच उमेदवार निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने रामराजे नाईक निंबाळकर आणि एकनाथ खडसे यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप आपले नशिब आजमावत आहेत. 

Web Title: Maharashtra Vidhan Parishad Election: MLC Gopichand Padalkar slams Mahavikas Aghadi over MLC election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.