Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2019 02:29 AM2019-09-27T02:29:47+5:302019-09-27T02:30:32+5:30

राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha 2019 BSP to win election in the arena! | Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

Vidhan Sabha 2019: बसपा स्वबळावर उतरणार निवडणूक आखाड्यात!

Next

- संतोष येलकर

अकोला : विधानसभा निवडणुकीत कोणाशीही युती-आघाडी न करता, बहुजन समाज पार्टी (बसपा) स्वबळावर निवडणूक आखाड्यात उतरणार असून, राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांच्यासह प्रदेश पदाधिकाऱ्यांनी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती यांची गुरुवार, २६ सप्टेंबर रोजी दिल्लीत भेट घेऊन निवडणुकीच्या विषयावर चर्चा केली. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या या बैठकीत कोणत्याही राजकीय पक्षासोबत युती किंवा आघाडी न करता, राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार विधानसभा निवडणुकीत राज्यातील सर्व २८८ जागा लढण्याची तयारी बसपाने सुरू केली आहे. त्यानुषंगाने विधानसभा निवडणुकीत बसपा स्वबळावर निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. बसपाच्या एकला चलो रे भूमिकेमुळे वंचितच्या उमेदवारांची अडचण होणार आहे.

मायावती येणार महाराष्ट्र दौºयावर
विधानसभा निवडणुकीत राज्यातील बसपा उमेदवारांच्या निवडणूक प्रचारासाठी बसपाच्या राष्ट्रीय अध्यक्ष मायावती लवकरच महाराष्ट्र दौºयावर येणार आहेत, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे यांनी सांगितले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha 2019 BSP to win election in the arena!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.