Vidhan Sabha 2019 : जळगावमध्ये ११ जागांसाठी शिवसेनेचे ४३ जण इच्छुक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2019 04:46 AM2019-09-17T04:46:21+5:302019-09-17T04:46:39+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019- कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याचा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत.
जळगाव : विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही परिस्थितीत तयार राहण्याचा सूचना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना रविवारी झालेल्या बैठकीत दिल्या आहेत. जिल्ह्यातील ११ जागांसाठी शिवसेनेच्यावतीने ४३ जण इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुंबई येथील शिवसेना भवनात राज्यातील २८८ मतदार संघातील इच्छुकांच्या मुलाखती होत आहेत. १७ व १८ सप्टेंबर रोजी उत्तर महाराष्टÑातील इच्छुकांच्या मुलाखती होतील. जळगाव लोकसभा मतदार संघात येणाºया सहा विधानसभा मतदार संघातील इच्छुकांची यादी ‘लोकमत’ ला प्राप्त झाली आहे. यात चाळीसगावला पप्पू गुंजाळ , महेंद्र पाटील, रमेश चव्हाण, एरंडोला माजी आमदार चिमणराव पाटील, जि.प.सदस्य डॉ. हर्षल माने, जळगाव शहरासाठी माजी महापौर नितीन लढ्ढा, विष्णू भंगाळे, माजी उपमहापौर सुनील महाजन यांची नावे आहेत. जळगाव ग्रामीणसाठी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासह जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ तर पाचोरा मतदारसंघासाठी विद्यमान आमदार किशोर पाटील यांचे एकमेव नाव आहे. अमळनेर मतदारसंघासाठी जिल्हा बँक संचालक व राष्टÑवादीचे पदाधिकारी अनिल भाईदास पाटील यांचे नाव देखील चर्चेत आहे. शिवसेनेकडून त्यांचे नाव वरिष्ठ पातळीवर पाठविण्यात आले आहे.