Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 06:37 AM2024-11-23T06:37:41+5:302024-11-23T06:38:40+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 MNS: १२३ जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे.
सुरेश ठमके, मुंबई
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS: निवडणूक आयोगाने दिलेली मान्यता टिकविण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला विधानसभा निवडणुकीत किमान तीन आमदार आणि तीन टक्के मतांची गरज आहे.
१२३ जागा लढणाऱ्या मनसेचा एकही आमदार निवडून न आल्यास एकूण मतदानाच्या आठ टक्के मतांची गरज आहे. राज ठाकरे यांनी २००७ मध्ये शिवसेनेमधून बाहेर पडत मनसेची स्थापना केली.
२००९ मधील विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे १३ आमदार निवडून आले होते. मनसेला ३ आमदार निवडून आणता आले नाहीत, तर अधिकृत पक्षाची मान्यता धोक्यात येईल, अशी माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली.
राज ठाकरे यांच्यावर महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास आहे. यंदाच्या निवडणुकीत निश्चितच राज्यातील जनता राज ठाकरे यांच्या मागे ठामपणाने उभे राहिल्याचे आपल्याला दिसेल. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या नव्या नियमानुसार मतांचा टप्पा गाठणे आणि आमदार निवडून आणणे हे उद्दिष्ट आम्हाला निश्चितच साध्य करता येणार आहे. - बाळा नांदगावकर, मनसेचे नेते