Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार; म्हणाले...
LIVE
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2024 07:25 AM2024-11-20T07:25:41+5:302024-11-20T09:23:55+5:30
Maharashtra Election 2024 Live Updates : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०) मतदान होत आहे. राज्यात एकूण ...
Maharashtra Election 2024 Live Updates : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी २८८ जागांसाठी आज, बुधवारी (दि.२०) मतदान होत आहे. राज्यात एकूण ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार आहे. यासाठी आता मतदारराजा आपल्या पसंतीच्या उमेदवाराला विधानसभेत पाठविण्यासाठी सज्ज झाला आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली असून संपूर्ण मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी निवडणूक आयोग आणि पोलीस यंत्रणा तयार आहे. गेल्या दोन-अडीच वर्षांत राज्यात बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे या सर्व राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES...
LIVE
20 Nov, 24 : 10:07 AM
रायगडमध्ये ९ वाजेपर्यंत ७.५५ टक्के मतदान
अलिबाग : रायगड जिल्ह्यातील सात विधानसभा मतदार संघात बुधवारी २० नोव्हेंबरला सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत ७.५५ टक्के मतदान झाले आहे. सात ही विधानसभा मतदार संघात सकाळच्या वेळी मतदानाला सौम्य प्रतिसाद मिळाला आहे.
20 Nov, 24 : 10:06 AM
मुंबईतील दहा विधानसभा मतदारसंघात ९ वाजेपर्यंत ०६.२५ टक्के मतदान
मुंबई : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानाला मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात आज दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ०७.०० वाजेपासून सुरुवात झाली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात सकाळी ०९.०० वाजेपर्यंत अंदाजे ०६.२५ टक्के मतदान झाले आहे.
20 Nov, 24 : 09:46 AM
राज्यात आतापर्यंत ६.६१ टक्के मतदान
राज्यात आतापर्यंत ६.६१ टक्के मतदान झालेले आहे. सर्वाधिक मतदान भांडुप आणि मुलुंड येथे झाले आहे. तर सर्वाधिक कमी मतदान वांद्रे येथे झाले आहे.
20 Nov, 24 : 09:35 AM
उदयनराजे भोसले यांनी बजावला मतदानाचा अधिकार
सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांनी अनंत इंग्लिश स्कूल येथे मतदान केले.
20 Nov, 24 : 09:33 AM
सकाळी ९ वाजेपर्यंत वाशिम जिल्ह्यात सरासरी ५.२७ टक्के मतदान
वाशिम : विधानसभा निवडणुकीसाठी वाशिम जिल्ह्यात सकाळी ९ वाजेपर्यंत एकूण ११०० मतदान केंद्रांत सरासरी ५.२७ टक्के मतदान झाले. गत पंचवार्षिक निवडणुकीत सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ५.३३ टक्के मतदान झाले होते.
20 Nov, 24 : 09:26 AM
शरद पवार यांनी बजावला मतदानाचा अधिकार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी पत्नीसह मतदानाचा अधिकार बजावला. यावेळी महाराष्ट्राच्या जनतेवर माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
20 Nov, 24 : 09:20 AM
धनंजय महाडिक यांनी बजावला मतदानाचा हक्क
कोल्हापूर : भाजपचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मतदानाचा हक्क बजावला. महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात कल्याणकारी योजना आणल्या, त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात महायुती कार आणण्यासाठी राज्यभरातील लोक उत्सुक आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
20 Nov, 24 : 09:03 AM
बुलढाणा जिल्ह्यात घाटाखाली मतदानाला शांततेत सुरूवात
खामगाव (बुलढाणा) : घाटाखालील खामगाव, मलकापूर, जळगाव जामोद मतदारसंघात मतदानाला शांततेत सुरूवात झाली. दरम्यान, जळगाव जामोद मतदारसंघातील मनसगावात मतदानयंत्रात बिघाड झाल्याने तेथे काही वेळ मतदान थांबले.
20 Nov, 24 : 08:56 AM
गोंदिया जिल्ह्यात मतदानाला सुरूवात
गोंदिया : जिल्ह्यात सकाळी ७ वाजतापासून मतदानाला सुरुवात झाली. थंडी असली तरी मतदान करण्यासाठी मतदारांनी सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. विशेष म्हणजे, अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नक्षल प्रभावित भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजोली भरनोली येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या मतदान करण्यासाठी रांगा लागल्या होत्या. यात महिला मतदारांची संख्या अधिक होती. तर शहरी भागातील मतदान केंद्रावर सुद्धा गर्दी दिसून आली. नवमतदारांनी सुद्धा मतदानाचा हक्क बजाविला.
20 Nov, 24 : 08:53 AM
अकोला, वाडेगावात ईव्हीएममध्ये बिघाड!
अकोला :जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, बाळापूर मतदार संघातील वाडेगाव, तसेच अकोला पश्चिम मतदारसंघातील बी. आर. स्कूल येथील मतदान केंद्रावरील ईव्हीएम यंत्रणेतील बिघाड तत्काळ दूर करून मतदान सुरळीत सुरू करण्यात आले आहे.
20 Nov, 24 : 08:44 AM
सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क
सचिन तेंडुलकरने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्यासह वांद्रातील मुंबई पब्लिक स्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
20 Nov, 24 : 08:41 AM
एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी बजावला मतदानाचा अधिकार बजावला आहे.
20 Nov, 24 : 08:38 AM
समीर भुजबळांसह शेफाली भुजबळांनी बजावला हक्क
समीर भुजबळ आणि शेफाली भुजबळ यांनी आज सकाळी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी छगन भुजबळ हे येवला तर समीर भुजबळ हे नांदगाव या विधानसभा मतदारसंघातून विजय होतील, असा विश्वास दोघांनी व्यक्त केला.
20 Nov, 24 : 08:35 AM
बाळासाहेब थोरातांनी कुटुंबीयांसोबत बजावला मतदानाचा अधिकार
बाळासाहेब थोरात यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा अधिकार बजावला आहे. मुलगी जयश्री थोरात आणि पत्नीसोबत मतदान केले आहे.
20 Nov, 24 : 08:34 AM
सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा अधिकार
सुप्रिया सुळे यांनी मतदानाचा अधिकार बजावला आहे. यावेळी, सर्व जनतेने बाहेर पडून जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करावे, असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी केले. बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे.
20 Nov, 24 : 08:20 AM
अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क
बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी सकाळी सात वाजता मतदान केंद्रावर दाखल होत मतदानाचा हक्क बजावला.
20 Nov, 24 : 08:15 AM
नांदेडमध्ये ईव्हीएम बंद
नांदेड : रवी नगर भागात मतदान केंद्र क्रमांक 182 मध्ये एक तासापासून ईव्हीएम बंद असून मतदार प्रतीक्षेत आहेत. याठिकाणी दोन मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात येत आहे.
20 Nov, 24 : 08:07 AM
प्रशांत डिक्कर यांच्यावर प्राणघातक हल्ला
जळगाव जामोद : विधानसभा मतदारसंघाचे जन स्वराज्य पक्षाचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्यावर पहाटे ५ वाजता शेगाव- मनसगाव रोडवर कालखेड फाट्याजवळ अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलवले.
20 Nov, 24 : 07:57 AM
कोल्हापुरात १२१ उमेदवारांचे भवितव्य ‘ईव्हीएम’मध्ये बंद होणार
कोल्हापूर जिल्ह्यातील दहा मतदारसंघात चुरशीच्या लढती असून, चार मतदारसंघांतील बंडखोरीमुळे तेथे आघाडी व युतीअंतर्गत संघर्ष वाढला आहे. या हा मतदारसंघात १२१ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
20 Nov, 24 : 07:53 AM
मोहन भागवत यांनी केले मतदान
नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी भाऊजी दफ्तरी शाळेमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
20 Nov, 24 : 07:48 AM
भूषण गगराणी यांनी बजावला मतदानाचा हक्क
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मतदानाचा हक्क बजावला.
20 Nov, 24 : 07:44 AM
पनवेलमध्ये मतदानाला सुरुवात
पनवेलमध्ये मतदानाला सुरुवात झाली असून अनेक ज्येष्ठ नागरिक व तरुण आपला मतदानाचा हक्क बजावताना दिसून येत आहेत.
20 Nov, 24 : 07:42 AM
मतदान केंद्रांवर मोबाईल घेऊन जाण्यास मज्जाव
राज्यात विधानसभा निवडणुकीवेळी मतदान करायला जाताना मतदारांनी मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई करण्यात आली आहे. मतदान प्रक्रियेत बाधा निर्माण करण्यासाठी, मतदान केंद्रांवरील शांतता भंग करण्यासाठी तसेच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करण्यासाठी मोबाइलचा गैरवापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाइल घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
20 Nov, 24 : 07:30 AM
सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ
सोलापूर : सोलापुरातील सर्वच मतदान केंद्रावर मतदानास प्रारंभ झाला असून बूथ प्रमुख, नेतेमंडळी व पक्षाच्या प्रमुखांसोबत कार्यकर्त्यांचे मतदान सुरू आहे.
20 Nov, 24 : 07:29 AM
मतदानाची वेळ कधीपर्यंत?
आज सकाळी सात वाजल्यापासून मतदान सुरू झाले असून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे. मतदानासाठी १२ प्रकारचे ओळखपत्रं ग्राह्य धरली, जातील असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. शनिवारी, २३ नोव्हेंबर रोजी मतदानाचा निकाल जाहीर होणार आहे.