Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 12:19 PM2024-10-17T12:19:30+5:302024-10-17T14:38:35+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या 'महासंग्रामा'साठी २० नोव्हेंबरला मतदान ...

Maharashtra Vidhan Sabha Assembly Election Voting Counting 2024 BJP Shiv sena Mahayuti Congress NCP Mahavikas Aghadi MNS VBA Live Updates | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live: राजकीय घडामोडींना आला वेग! हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. या 'महासंग्रामा'साठी २० नोव्हेंबरला मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होईल. राज्यात गेल्या दोन-अडीच वर्षांत बदललेली राजकीय समीकरणं पाहता, महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची आहे. स्वाभाविकच, या दोन्ही आघाड्या विजयासाठी सर्वस्व पणाला लावतील. अर्थात, बंडखोरी, तिसरी आघाडी, वंचित बहुजन आघाडी, मनसे, जरांगे-पाटील हेही या निवडणुकीत निर्णायक मुद्दे ठरू शकतात. यंदा दिवाळीच्या धामधुमीसोबतच महाराष्ट्राच्या राजकारणात कुणाच्या फटाक्याचा आवाज घुमणार आणि कोण फुसका बार ठरणार, याकडेही जनतेचं लक्ष आहे. याच सर्व राजकीय घडामोडींचे LIVE UPDATES...

 

 

LIVE

Get Latest Updates

17 Oct, 24 : 03:22 PM

विखे पाटील भेटीनंतर जरांगेंची फडणवीसांवर टीका

 आता मैदान वेगळे आहे, ते जिंकायचे की पाडायचे ठरेल. नारायणगडाची सभा झाल्यापासून इच्छुक उमेदवार वाढल्याचे वाढत आहे. जेव्हा ठरेल जो कोणत्याही पक्षाचा असेल तो आमच्या विचाराचा असेल तर मराठे त्याच्यामागे त्याच्या मागे उभे राहणार आहेत. 'माझे ऐक नाहीतर खतम करू' अशी सूडबुद्धीची रचना सुरू आहे. त्यांचा शेवट राजकीय अंतात असेल, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

इच्छुक उमेदवार यांच्या सोबत चर्चा सुरू आहे. ज्यावेळी पाडायचे की लढायचे हे ठरेल, तेव्हा बाकीच्या बाबी ठरतील. आता फक्त चर्चा होणे आवश्यक आहे. इथे येणारे इच्छुक उद्याचे भविष्य आहेत. माझ्या समाजासाठी ही चर्चा गरजेची आहे. २० तारखेची बैठक व्यापक आणि निर्णायक आहे. आता कोणाला शक्ती दाखवायची गरज नाही, असे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

17 Oct, 24 : 02:24 PM

भाजपाचे मुंबईत धक्कातंत्र? ५ आमदारांची तिकीट कापणार?

भाजपा या निवडणुकीत धक्कातंत्र वापरणार असल्याची बातमी समोर आली आहे. या निवडणुकीत मुंबईत काही नेत्यांची तिकीट कापली जाण्याची शक्यता आहे. मागील विधानसभा निवडणुकीत भाजपला मुंबईत समाधानकारक यश मिळालं होतं. ही कामगिरी कायम ठेवण्यासाठी ज्या विद्यमान आमदारांबाबत मतदारसंघात प्रतिकूल स्थिती आहे, अशा आमदारांना भाजपकडून डच्चू देण्यात येणार आहे. यामध्ये घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार राम कदम यांच्यासह वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकर, सायनचे आमदार तमिल सेल्वन, घाटकोपर पूर्वचे आमदार पराग शाह आणि बोरिवलीचे आमदार सुनील राणे यांचाही समावेश असल्याचे समजते. याबाबत 'एबीपी माझा'ने वृत्त दिलं आहे. 

17 Oct, 24 : 01:55 PM

हितेंद्र ठाकूर मविआला पाठिंबा देणार? भाजपाला धडा शिकवायचा निर्धार!

आचारसंहिता लागू होताच राज्यातील राजकारणाला वेग आला आहे. यातच आता अडचणीच्या काळात अनेकदा मदत करणारे बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूरमहायुतीची साथ सोडण्याच्या तयारीत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या विधानसभा निवडणुकीत हितेंद्र ठाकूर यांनी महाविकास आघाडीला साथ देण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, मविआची साथ बविआला मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू केल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. 

गेल्या २५ वर्षांपासून वसई विरारच्या राजकारणात हितेंद्र ठाकूर यांची एकहाती सत्ता आहे. गेल्या १० वर्षांत हितेंद्र ठाकूर यांनी वेळोवेळी महायुतीला साथ दिली. मात्र, आता हितेंद्र ठाकूर हे महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीला पाठिंबा देणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

17 Oct, 24 : 01:29 PM

आम आदमी पक्ष महाराष्ट्रात निवडणूक लढवणार नाही; 'मविआ'ला ताकद देणार?

आगामी विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांचा पक्ष आम आदमी पार्टी उमेदवार उतरणार नाही. दिल्ली विधानसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत करून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पडू नये यासाठी महाराष्ट्र, झारखंड विधानसभा निवडणूक न लढण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार आहे. इंडिया आघाडी मजबूत करणे, पक्षसंघटना बळकट करणे यावर आप पक्षाकडून भर दिला जात आहे. पक्षाच्या महाराष्ट्र कार्यकारिणीकडून विधानसभा निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे परंतु पक्षाच्या वरिष्ठांकडून निवडणूक न लढण्याचे संकेत मिळत आहेत.

17 Oct, 24 : 01:06 PM

आमदारांना 'मातोश्री'चं बोलावणं!

विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच, उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या सर्व आमदारांना 'मातोश्री'वर बोलावलं आहे. जागावाटपाचे अपडेट्स आणि एकूणच पक्षाची रणनीती याबाबत ते बैठकीत मार्गदर्शन करतील. 

17 Oct, 24 : 12:42 PM

भाजपाचे 'मिशन मनधरणी'?

मनोज जरांगे-पाटील यांनी भाजपा आणि खास करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा वेळी, भाजपा नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मध्यरात्री त्यांची भेट घेतलीय. २० ऑक्टोबरला जरांगे आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्याआधी त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचं बोललं जातंय. 

17 Oct, 24 : 12:37 PM

IRS अधिकारी समीर वानखेडे राजकारणात?

आर्यन खान अटक आणि नवाब मलिक यांच्याशी झालेल्या वादामुळे चर्चेत आलेले समीर वानखेडे एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणातही उतरू शकतात.  

17 Oct, 24 : 12:25 PM

काँग्रेसची ६० नावं ठरली

महाविकास आघाडीतील जागावाटपाचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात आलेला असताना, काँग्रेसनं दिल्लीतील छाननी समितीच्या बैठकीत ६० उमेदवार निश्चित केलेत. काँग्रेसची पहिली यादी २० ऑक्टोबरनंतरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Assembly Election Voting Counting 2024 BJP Shiv sena Mahayuti Congress NCP Mahavikas Aghadi MNS VBA Live Updates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.