Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 04:04 PM2024-11-12T16:04:42+5:302024-11-12T16:06:53+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज चिमुर येथील सभेत महाविकास आघाडीवर निशाणा साधला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Aghadi is a big player of corruption, in stopping their PhD development PM Modi criticized on Maha Vikas Aghadi | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'आघाडी म्हणजे भष्ट्राचाराचे मोठे खेळाडू, त्यांची पीएचडी विकास थांबवण्यात', पंतप्रधान मोदींचा महाविकास आघाडीवर निशाणा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : भाजपाने राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी केल्याचे दिसत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या सभा सुरू आहेत. आज  पीएम मोदी यांची चिमुर येथे सभा झाली. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली. आघाडी हा भ्रष्टाचाराचा सर्वात मोठा खेळाडू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि शरद पवार यांचा पक्ष महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. 

'शरद पवारांमुळे राजकारणाचा विचका', राज ठाकरेंचं म्हणणं मान्य आहे का? नितीन गडकरी म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, महाविकास आघाडीने विकास प्रकल्प रखडवणे, वळवणे यात पीएचडी केली आहे. महाराष्ट्राचा झपाट्याने विकास हा फक्त आघाडीच्या लोकांच्या बोलण्याने नाही. महाविकास आघाडीने फक्त ब्रेकिंगच्या कामात पीएचडी केली आहे. काम रखडवणं, दिरंगाई करणं आणि दुसरीकडे वळवणं. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसनं दुप्पट पीएचडी केली असंही ते म्हणाले. विकासकामांना ब्रेक लावण्यात काँग्रेस तरबेज आहे. हे काँग्रेसी लोक यात निष्णात आहेत. वर्षानुवर्षे प्रत्येक विकास प्रकल्प रोखण्याचा प्रयत्न आघाडीचेच लोक भ्रष्टाचाराचे सर्वात मोठे खेळाडू आहेत, असा आरोपही मोदींनी केला.

पंतप्रधान मोदींनी उपस्थितांना विचारले की चिंबूरची जनता महाविकास आघाडीला शहराच्या विकासात अडथळा आणू देणार का? त्यांना पुन्हा लुटण्याचा परवाना देणार का? लूट करू देणार का, तिजोरी भरू देणार का? महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या विकासात अडथळा आणू देणार का? हे आघाडी पक्ष प्रगतीच्या आड कसे आडवे येतात याचे चंद्रपूरची जनताच साक्षीदार असल्याचे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधान मोदींनी विरोधी पक्षांच्या आघाडीवर खरपूस समाचार घेतला. मोदी म्हणाले, महायुती सरकार कोणत्या गतीने काम करते आणि हे आघाडी पक्ष काम कसे थांबवतात, हे चंद्रपूरच्या जनतेपेक्षा चांगले कोण जाणू शकेल? येथील लोक अनेक दशकांपासून रेल्वे कनेक्टिव्हिटीची मागणी करत आहेत, पण काँग्रेस आणि आघाडीच्या लोकांनी कधीही त्यावर काम होऊ दिले नाही, असंही मोदी म्हणाले.

येत्या पाच वर्षात भाजपचा जाहीरनामा महाराष्ट्राच्या विकासाची हमी असेल, महायुतीबरोबरच केंद्रातील एनडीएचे सरकार म्हणजे महाराष्ट्रात दुहेरी इंजिनचे सरकार, म्हणजे विकासाचा दुप्पट वेग असणार आहे. आज मला महाराष्ट्र भाजपचे अभिनंदन करायचे आहे, ज्यांनी एक अद्भुत जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये आपल्या मुली, भगिनी, शेतकरी, देशाच्या व महाराष्ट्राच्या युवाशक्तीच्या विकासासाठी अनेक अप्रतिम संकल्प करण्यात आले आहेत, असंही मोदी म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Aghadi is a big player of corruption, in stopping their PhD development PM Modi criticized on Maha Vikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.