आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2024 12:15 AM2024-11-03T00:15:43+5:302024-11-03T00:21:44+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आता या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिटी या चिन्हाचा वापर करता येणार नाही. 

maharashtra vidhan sabha election 2024 Another party's election symbol gone symbol of the whistle is reserved for the Janata Dal | आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित

आणखी एका पक्षाचे निवडणूक चिन्ह गेले; शिट्टी हे चिन्ह जनता दल (युनायटेड) साठी आरक्षित

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिट्टी हे निवडणूक चिन्ह जनता दल (युनायटेड) या पक्षासाठी आरक्षित ठेवण्याच्या सूचना निवडणूक आयोगाच्या राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी आता शिट्टी हे निवडणूक हे चिन्ह जनता दलसाठी आरक्षित करण्यात आले आहे. यामुळे आता या निवडणुकीत बहुजन विकास आघाडी सह इतर नोंदणीकृत राजकीय पक्ष तसेच अपक्षांना शिटी या चिन्हाचा वापर करता येणार नाही. 

या निर्णयामुळे हितेंद्र ठाकूर यांना मोठा धक्का बसला आहे. यावर बोलताना हितेंद्र ठाकूर म्हणाले, माझे कार्यकर्ते आणि मिडिया यांच्या माध्यमातून कोणतीही नवीन निशानी एक दिवसात घराघरात पोहचवतील असा  विश्वास आहे. एवढ्या खालच्या दर्जाच राजकारण कुणी करु नये, ज्यांना हरण्याची भिती आहे. तेच लोक असे उपक्रम करतात, लोक बोलत नसतात, पण लोक बघतात, लोक सुज्ञ आहेत, असंही ते म्हणाले.

Web Title: maharashtra vidhan sabha election 2024 Another party's election symbol gone symbol of the whistle is reserved for the Janata Dal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.