Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 11:43 PM2024-10-31T23:43:30+5:302024-10-31T23:44:49+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला निवडणूक आयोगाने मोठा दिलासा दिला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाने 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द करण्याचा निर्णय घेतला आहेत. तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या चिन्हाचं नाव मात्र तुतारी वाजवणारा माणूस हे कायम ठेवले आहे. लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेट या चिन्हाचा उल्लेख तुतारी असा करण्यात आल्यामुळे शरद पवार गटाला मोठा फटका बसला असल्याचा दावा केला होता. त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा निर्णय दिला आहे.
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाचा हा निर्णय महत्वाचा आहे. मागील वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली त्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह मिळालं. लोकसभा निवडणुकीत राज्यातील अपक्ष उमेदवारांनी ट्रम्पेट हे चिन्ह घेऊन लढले या चिन्हाच मराठीमध्ये भाषांतर तुतारी असं केलं होतं. काही लोकसभा मतदारसंघात हजारोंच्या संख्येने या ट्रम्पेट चिन्ह घेऊन उभे असलेल्या उमेदवारांना मिळाली. सातारा लोकसभेत याचा मोठा फटका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला बसला होता. यामुळे शरद पवार यांच्या पक्षाने राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांकडे याची तक्रार केली होती. यावरुन राज्याचे निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आता राज्यातील अधिकाऱ्यांना नवीन आदेश दिले आहे.
यामुळे आता राज्यातील विधानसभा निवडणुकीमध्ये ट्रम्पेट याचे मराठीमध्ये भाषांतर तुतारी नसणार आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा दिलासा आहे.