Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 02:34 PM2024-11-16T14:34:20+5:302024-11-16T14:39:54+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: भाजपा नेते आशिष शेलार यांनी 'व्होट जिहादवरुन महाविकास आघाडीला इशारा दिला.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 bjp leader criticized on mahavikas aghadi | Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ): विधानसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत आता आज 'व्होट जिहादचा मुद्दा चांगलाच गाजला आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात असताना भाजपने आता व्होट जिहादच्या मुद्द्यावर जोर दिला असून, देवेंद्र फडणवीसांनी खडकवासला येथील सभेत मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवत महाविकास आघाडीवर व्होट जिहादचा आरोप केला आणि हल्ला चढवला. दरम्यान, आता भाजपा नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा नेते आशिष शेलार यांनी व्होट जिहादवरुन महाविकास आघाडीला इशारा दिला आहे. 

शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट

भाजपा नेते आशिष शेलार यांनी आज माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. व्होट जिहादवरुन बोलताना शेलार म्हणाले, समाज माझ्याबरोबर आहेत हा भाग वेगळा पण व्होट जिहादची भाषा करणाऱ्या व्यक्तीवर काँग्रेस तक्रार करणार आहे का? असा सवाल शेलार यांनी केला. नोमानी यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओत ते व्होट जिहादची भाषा करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. आता धर्मासाठी युद्ध कस करायचं हे छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला शिकवलं आहे. 

"आम्ही व्होट जिहाद कधीही केलेले नाही, भाजपा सबका साथ सबका विकास म्हणत आहे. आता विरोधकांचे पुरावे समोर आले आहेत, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व असले आहे का? असा टोलाही ठाकरे यांना शेलार यांनी लगावला.  महाविकास आघाडीचा पराभव होणार आहे, आता पराभव टाळण्यासाठी व्होट जिहाद करत आहेत, असा आरोप शेलार यांनी केला. महाविकास आघाडीच्या पाया खालची वाळू घसरायला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता विरोधक निवडणूक आयोग, पैसे याची कारणे सांगत आहेत, असंही शेलार म्हणाले.

व्होट जिहादवरुन शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर

शरद पवार यांची साताऱ्यामध्ये पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत पवारांना व्होट जिहादच्या मुद्द्यावरून प्रश्न विचारण्यात आला.  

देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभेत मौलाना सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ दाखवला. त्यामुळे राज्यातील राजकारण तापलं आहे. त्याबद्दल शरद पवार म्हणाले, "व्होट जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीसांनी काढला. हा काही इतर कुणी काढलेला नाही. आणि त्याचं कारण काही मतदारसंघात अल्पसंख्याकांनी महाविकास आघाडीच्या मतदारांना मतदान केलं."

"असं आहे की, एखाद्या मतदारसंघात एखादा समाज जास्त असेल. उदाहरणार्थ, पुण्याच्या विशिष्ट भागात हिंदू समाज आहे, त्यांनी भाजपला मतदान केलं, भाजपला तर आम्हाला सवय आहे ती की, इथे असंच मतदान होतं. याचा अर्थ तो मी काही जिहाद समजत नाही. त्याला धार्मिक रंग देत नाही. तिथल्या लोकांची विचारधारा आहे", असे शरद पवार म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 bjp leader criticized on mahavikas aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.