Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 09:28 AM2024-10-25T09:28:07+5:302024-10-25T09:31:30+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात मोठी खेळी केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar announced a candidate against MLA Jayant Patil | Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024: अजित पवारांचा जयंत पाटलांना धक्का! सांगलीत 'घड्याळ' चिन्हावर दोन उमेदवार उतरवणार

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून आता उमेदवारांची घोषणा होण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे आता लढतीही ठरल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यामुळे या निवडणुकीत काही मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत दिसत आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात मोठी खेळी केली आहे. पवार यांनी भाजपा नेते निशिकांत पाटील आणि माजी खासदार संजयकाका पाटील यांनी पक्षात प्रवेश दिला आहे. यामुळे आता तासगाव आणि इस्लामपूर मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशीच लढत होणार आहे. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांनी ११ नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवलं; होणार मोठी लढत

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगली जिल्ह्यात विशेष लक्ष दिल्याचे बोलले जात आहे. यामुळे आता भाजपामधील दिग्गज नेत्यांना पक्षप्रवेश देऊन 'घड्याळ' निवडणूक लढवणार असल्याचे बोलले जात आहे. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात निशिकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून 'घड्याळ' चिन्हावर निवडणूक लढवणार लढवणार आहे. आज निशिकांत पाटील यांना पक्षात प्रवेश देण्यात आला आहे. निशिकांत पाटील यांना उमेदवारीही जाहीर करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे, तासगाव -कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून लढणाऱ्या रोहित पाटील यांच्याविरोधातही महायुतीने मोठी खेळी केली आहे. भाजपाचे माजी खासदार संजयकाका पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमधून उमेदवारी जाहीर देण्यात येणार आहे. आज पाटील यांनी उमपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. यामुळे आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत. 

रोहित पाटील यांच्याविरोधात संजयकाका पाटील लढणार..

तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पाटील आहेत, त्यांच्याविरोधात आता माजी खासदार संजयकाका पाटील निवडणूक लढणार आहेत. या मतदारसंघात गेल्या अनेक वर्षापासून घड्याळ हे चिन्ह रुजले आहे, याचा फायदा महायुतीला होऊ शकतो अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे, यामुळे पाटील यांना राष्ट्रवादीमधून उमेदवारी देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Deputy Chief Minister Ajit Pawar announced a candidate against MLA Jayant Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.