Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 04:42 PM2024-10-22T16:42:09+5:302024-10-22T16:51:29+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : माजी मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी दोन दिवसापूर्वी शरद पवार गटात प्रवेश केला, यानंतर आता गायत्री शिंगणे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Gayatri Shingane join ncp Met Ajit Pawar | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : काका विरुद्ध पुतणी! गायत्री शिंगणे घड्याळ हातात बांधणार? अजित पवारांची घेतली भेट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून रणधुमाळीला सुरूवात झाली. उमेदवारांच्या घोषणेलाही सुरुवात झाली आहे. नेत्यांच्या पक्षप्रवेशाला सुरुवात झाली असून काही दिवसापूर्वी सिंदखेड राजा येथील आमदार राजेंद्र शिंगणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार गटातून खासदार शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला, यामुळे  शिंगणे यांची पुतणी गायत्री शिंगणे नाराज असल्याचे समोर आले. त्यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. 

भाजपातील गटबाजीला कंटाळले, राष्ट्रवादीत गेले, तिथेही दिला राजीनामा; आता ठाकरेंकडे चालले

या भेटीमुळे गायत्री शिंगणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून विधानसभा निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. राजेंद्र शिंगणे यांच्या पक्ष प्रवेशानंतर गायत्री शिंगणे यांनी खासदार शरद पवार यांच्याकडे उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. यामुळे आता गायत्री शिंगणे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोडण्याच्या तयारीत दिसत आहेत. शिंगणे यांना सिंदखेडराजा येथून विधानसभा निवडणूक लढवायची आहे. यामुळे त्यांनी अजित पवार यांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे. 

सिंदखेडराजा विधानसभा मतदारसंघात यावेळी काका विरुद्ध पुतणी असा सामना होऊ शकतो. 

दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला इशारा दिला होता

 राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेले राजेंद्र शिंगणे परतीच्या मार्गावर असल्याची कुणकुण लागताच गायत्री शिंगणे यांनी बंडाचे संकेत दिले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली नाही, तर अपक्ष लढणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.  

"शंभर टक्के अपक्ष म्हणून लढणारच. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रवेशाला आणि उमेदवारीला शंभर टक्के विरोध आहे. कारण पाच वर्षांपासून मी काम करतेय. पक्ष फुटल्यानंतरही एकनिष्ठेने काम केलं. बुलढाणा जिल्ह्यात राष्ट्रवादीचे काय हाल होते, सगळ्यांना माहिती आहे", असे सांगत गायत्री शिंगणे यांनी बंडाचे संकेत दिले. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Gayatri Shingane join ncp Met Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.