Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 04:24 PM2024-11-20T16:24:39+5:302024-11-20T16:29:19+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांनी अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांना धमकी दिल्याची माहिती समोर आली होती.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 I did not threaten Sameer Bhujbal Disclosure of Suhas kande | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) :  नांदगाव विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार समीर भुजबळ आणि शिंदे गटाचे उमेदवार सुहास कांदे यांच्यात वादावादी झाल्याची माहिती समोर आली होती. सुहास कांदे यांनी बोलावलेल्या मतदारांना भुजबळ यांनी अडवले. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी सुहास कांदे यांनी समीर भुजबळ यांना धमकी दिल्याचे समोर आले होते. याबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. दरम्यान, आता या प्रकरणावर आमदार सुहास कांदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "तुझा मर्डर फिक्स", सुहास कांदेंची समीर भुजबळांना जीवे मारण्याची धमकी; दोन्ही गटात जोरदार वादावादी

नांदगाव मतदारसंघातील वादानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. सुहास कांदे यांच्यावर टीकाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, आता सुहास कांदे यांनी 'मी समीर भुजबळ यांचं नाव घेऊन कोणतीही धमकी दिली नाही',असं स्पष्टीकरण दिले आहे.  आमदार सुहास कांदे यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी सकाळी घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. 

सुहास कांदे म्हणाले, 'मी मतदान केलं खूप आनंदी आहे, आपलं कर्तव्य प्रत्येक नांदगावकर बजावत आहे त्यांचा आम्हाला आनंद आहे. नांदगावची माझी मायबाप जनता आम्हाला केलेल्या विकासावर मतदान करेल, असा विश्वासही कांदे यांनी व्यक्त केली. 

सकाळी झालेल्या गोंधळावर बोलताना सुहास कांदे म्हणाले, "आमचे काही ऊसतोड कामगार वेगवेगळ्या कारखान्यावर जातात, ते सर्व आले होते. त्यांच्याच मुकादमांनी त्यांना जेवण ठेवले होते. त्यावेळी समीर भुजबळ आणि त्यांचे काही गुंड आले, त्यांनी त्यांना मारहाण करुन जातीवाचक शिव्या दिल्या आणि गाड्या अडवून तोडफोड केली. ही माहिती मला समजली. ते सर्व मतदार होते. मी त्यांच्या मदतीला गेलो. या प्रकरणी आता आम्ही पोलिसांकडे आणि निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, असंही सुहास कांदे म्हणाले. 

"आम्ही निवडणूक आयोगाला सांगिकलं की ही लोक मतदार नसतील तर यांना अटक करा. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी त्या लोकांच्या कागदपत्रांची तपासणी केली, ती लोक मतदार आहेत हे कळल्यानंतर त्यांना सोडण्यात आले, असंही कांदे म्हणाले.

धमकीवर दिले स्पष्टीकरण

समीर भुजबळ यांना दिलेल्या धमकीवर बोलताना सुहास कांदे म्हणाले,  मी समीर भुजबळ यांचे नाव घेऊन धमकी दिलेली नाही. हे चुकीचे व्हायरल होत आहे. मी असं नाव घेऊन काही बोललो नाही. आमच्यातील एकजण त्या कामगाराला मारत होता. म्हणून मी त्याला तो मरुन जाईल, त्याचा मर्डर होईल मारु नको असं सांगितलं, असंही सुहास कांदे म्हणाले. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 I did not threaten Sameer Bhujbal Disclosure of Suhas kande

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.