Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के.पी. पाटलांनी ठाकरे गटात केला प्रवेश; शिंदे गटाच्या आबिटकरांविरोधात रिंगणात उतरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2024 03:19 PM2024-10-23T15:19:06+5:302024-10-23T15:23:01+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राधानगरीच्या के. पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. भाजपा, शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली आहे. महाविकास आघाडीची जागावाटपाबाबत बैठका सुरू आहेत. दरम्यान, ठाकरे गटात नेत्यांचे प्रवेश वाढल्याचे दिसत आहे. आज राधानगरी विधानसभा मतदारसंघातील के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. यामुळे आता राधानगरी विधानसभा मतदारसंघात शिंदे गटातून प्रकाश आबिटकर तर ठाकरे गटातून के.पी. पाटील असा लढत होण्याची शक्यता आहे.
माजी आमदार के.पी. पाटील यांनी आज मुंबईतील मातोश्रीमध्ये ठाकरे गटात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला. के.पी. पाटील यांच्या प्रवेशामुळे मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याची चर्चा आहे.
राधानगरीत पुन्हा गुरु विरुद्ध चेल्यात लढत
सरवडे :राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळणार या बहुचर्चित ठरलेल्या प्रश्नाला के. पी.पाटील यांच्या उमेदवारीने पूर्णविराम मिळाला. राधानगरीत पुन्हा एकदा के.पी.पाटील गुरू विरुद्ध आमदार प्रकाश आबिटकर ह्या चेल्यात सामना होणार आहे. तर उद्धवसेना विरुद्ध शिंदेसेना अशी रंगतदार लढत दिसणार आहे, त्यामुळे ही लढत जिल्ह्यातून लक्ष वेधून घेणारी ठरणार आहे.
गेले अनेक दिवस राधानगरी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून कुणाला उमेदवारी मिळणार यावरच चर्चेचे गुराळ सुरू होते. अखेर निवडणुकीत लढाईत कोण उजवे ठरणार हा निकष ठेवत उमेदवारी निश्चित केल्याचे समजते. त्यामुळे या मतदारसंघात शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी के .पी. पाटील यांना घडाळ्यातीत हातात शिवबंधन बांधत आज उमेदवारी जाहीर केली. माजी मंत्री,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील ,माजी कृषी मंत्री शरदचंद्र पवार ,माजी मंत्री जयंत पाटील आदी प्रमुख मंडळी के. पी. पाटील यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे रस्सीखेच शर्यतीत असलेले के. पी .पाटील यांचे मेहुणे ए .वाय. पाटील व अन्य मंडळी यांची भूमिका काय लवकरच स्पष्ट होईल. एकूणच काय या मतदारसंघात महाविकास आघाडी विरोधात महायुती अशीच लढत होणार हे स्पष्ट झाले.
कोल्हापूरमधील राधानगरी विधानसभेचे माजी आमदार के. पी. पाटील ह्यांनी आज मातोश्री येथे त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. मनगटावर शिवबंधन बांधून पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय… pic.twitter.com/DyKUVfT647
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 23, 2024
गत निवडणुकीत आठ उमेदवारांनी नशीब आजमावले होते. यावेळी हे सगळे इच्छुक सावध झाले आहेत. महाविकास आघाडीतून उमेदवारी मिळविण्यासाठी चढाओढ लागल्याचे चित्र आहे. शिंदेसेनेतून आबिटकर यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
या मतदारसंघात गत दोन्ही निवडणुकींत शिवसेनेतून आमदार आबिटकर हे विजयी झाले. त्यामुळे आघाडी धर्मानुसार ही जागा उद्धवसेनेकडे जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाकडे उपजिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, राहुल देसाई हे तिकिटासाठी जोडण्या लावत आहेत. तर दुसरीकडे आज के.पी. पाटील यांनी ठाकरे गटात थेट प्रवेशच केला आहे, यामुळे आता त्यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.