Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 03:38 PM2024-10-22T15:38:37+5:302024-10-22T15:40:23+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Meetings between Uddhav Thackeray and BJP begin, will come together after elections Big secret explosion of Prakash Ambedkar | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांच्या जागावाटपावर चर्चा सुरू आहे. वंचित बहुजन आघाडीने मोठी तयारी केली असून उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, आता उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाच्या बैठका सुरू असल्याचा मोठा गौप्यस्फोट प्रकाश आंबेडकर यांनी केला. यामुळे आता राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'

प्रकाश आंबेकर यांनी आज गोंदिया येथे पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी हा गौप्यस्फोट केला. आंबेडकर म्हणाले, मी सगळ्या लोकशाहीवादी आणि त्याचबरोबर मुस्लिम समाजाला आवाहन करत आहे की, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या आणि भाजपाची बैठका सुरू आहेत. विधानसभा एकदा संपली की हे परत एकदा भाजपासोबत जातील, असा मोठा गौप्यस्फोट आंबेडकर यांनी केला.

"याची भीती व्यक्त केली जात आहे.  म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मुस्लिम समाज त्यांच्याकडून आश्वासन घ्यायला सांगत आहे. आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी कशा पद्धतीने त्यांना आश्वासन देत आहे हे पाहणे महत्वाचे आहे, असंही आंबेडकर म्हणाले. 

वंचितची पाचवी यादी जाहीर

:प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने यंदा  विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर करण्याचा सपाटा लावला आहे. वंचित आघाडीकडून आज आपल्या उमेदवारांची पाचवी यादी जाहीर करण्यात आली असून वंचितने आज १६ जागांसाठी उमेदवारांची घोषणा केली.

वंचितकडून पाचव्या यादीत कोणाकोणाला संधी?
 
१. भुसावळ - जगन देवराम सोनवणे
२. मेहकर - डॉ. ऋतुजा चव्हाण
३. मूर्तिजापूर - सुगत वाघमारे 
४. रिसोड - प्रशांत सुधीर गोळे
५. ओवळा माजिवडा- लोभर्सिग गणपतराव राठोड
६. ऐरोली - विक्रांत दयानंद चिकणे
७. जोगेश्वरी पूर्व - परमेश्वर रणशुर 
८. दिंडोशी - राजेंद्र तानाजी ससाणे 
९. मालाड - अजय आत्माराम रोकडे 
१०. अंधेरी पूर्व - अॅड. संजीवकुमार कलकोरी
११. घाटकोपर पश्चिम - सागर रमेश गवई 
१२. घाटकोपर पूर्व - सुनिता मायकवाड
१३. चेंबूर - आनंद भीमराव जाधव 
१४. बारामती- मंगलदास तुकाराम निकाळजे 
१५. श्रीगोंदा - अण्णासाहेब शेलार 
१६. उदगीर - प्रा. डॉ. शिवाजीराव मरेप्पा देवनाळे  

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Meetings between Uddhav Thackeray and BJP begin, will come together after elections Big secret explosion of Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.