Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2024 06:46 PM2024-11-06T18:46:13+5:302024-11-06T19:02:36+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आमदार सदाभाऊ खोत यांनी आज खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MLA Jitendra Awad responded to Sadabhau Khot's criticism | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. प्रचारसभांना सुरुवात झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. आज महायुतीची जत विधानसभा मतदारसंघात गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारासाठी सभा झाली. या सभेत आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली, या टीकेला आता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. 

“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

आज बुधवारी जत विधानसभा मतदारसंघात महायुतीने जाहीर सभा घेतली. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते आमदार सदाभाऊ खोत यांनी खासदार शरद पवार यांच्यावर वादग्रस्त टीका केली. सदाभाऊ खोत सभेत बोलताना म्हणाले, शरद पवार म्हणतात महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय म्हणजे आता महाराष्ट्र तुमच्याचेहऱ्यासारखा करणार का? अशी वादग्रस्त टीका खोत यांनी केली. 

या टीकेला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रत्युत्तर दिले. आव्हाड म्हणाले,  सदाभाऊ खोत शरद पवारांबद्दल बोलताना तुम्हाला लाज कशी वाटली नाही. चौथ्या स्टेजचा कॅन्सर असल्यामुळे त्यांचा जबडा काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी त्यांचं ऑपरेशन झालं त्याच्या काही दिवसानंतर लगेच शरद पवार रक्त येत असताना देखील सभांमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे आपण काय बोलतो याची काही समज नाही का आपल्याला. महाराष्ट्र घडवण्यात तुमचा एक टक्का वाटा नाही, शरद पवारांचा शंभर टक्के वाटा आहे, असा पलटवार जितेंद्र आव्हाड यांनी केला. 

"त्यांच्या चेहऱ्यावरुन त्यांना बोलणं यावरुन तुमची अक्कल शून्यता लक्षात येते. तुमची अक्कल धुळीला मिळाली आहे. सदाभाऊ खोत तुमच्या वडिलांची तुम्ही अशी टिंगल केली असती का? तुमच्या चेहऱ्यावर डाग पडला तर घरातून बाहेर पडणं मुश्किल होईल, असा निशाणा आमदार आव्हाड यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर साधला.

सदाभाऊ खोतांचं शरद पवारांबाबत वादग्रस्त विधान

"पवारसाहेब तुमच्या चिल्यापिल्यांनी कारखाने हाणले, सुतगिरण्या हाणल्या, बँका हाणल्या...पण पवारसाहेबांना मानावं लागेल. ते म्हणतायत की, मला महाराष्ट्राचा चेहरा बदलायचाय. तुम्हाला काय तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र पाहिजे का?" अशी बोचरी टीका सदाभाऊ खोतांनी यावेळी केली. सदाभाऊंनी शरद पवारांच्या शारीरिक व्यंगावर टीका केल्यामुळे नव्या वादाची शक्यता आहे. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MLA Jitendra Awad responded to Sadabhau Khot's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.