Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2024 12:31 AM2024-10-29T00:31:49+5:302024-10-29T00:35:33+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS seventh list announced; Candidates given in Indapur, Parner | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मनसेची सातवी यादी जाहीर; इंदापूर, पारनेरमध्ये उमेदवार दिले

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : महाराष्ट्र नव निर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीसाठी सातवी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत १८ उमेदवारांचा समावेश आहे. मनसेने आतापर्यंत १३५ उमेदवारांची घोषणा केली आहे. बाळापूरमधून मंगेश गाडगे, इंदापूर- अमोल देवकाते, पारनेर- अविनाश पवार ,खानापूर - राजेश जाधव या उमेदवारांची घोषणा केली आहे.

मनसेने पुरंदर विधानसभेतून उमेश जगताप, औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे, कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील, उरण- सत्यवान भगत यांना मैदानात उतरवले आहे.

या नेत्यांना मिळाली उमेदवारी

बाळापूर - मंगेश गाडगे
मूर्तिजापूर-भिकाजी अवचर
वाशिम- गजानन वैरागडे 
हिंगणघाट- सतीश चौधरी
उमरखेड - राजेंद्र नजरधने
औरंगाबाद मध्य- सुहास दाशरथे
नांदगाव- अकबर सोनावाला 
इगतपुरी - काशिनाथ मेंगाळ 
डहाणू- विजय वाढिया
बोईसर- शैलेश भुतकडे
भिवंडी पूर्व- मनोज गुळवी
कर्जत खालापूर- जगन्नाथ पाटील
उरण- सत्यवान भगत
इंदापूर- अमोल देवकाते
पुरंदार - उमेश जगताप
 श्रीरामपूर- राजू कापसे
पारनेर- अविनाश पवार 
खानापूर - राजेश जाधव

मनसेप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे, शिंदे गटाचे विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र या लढतीत आता मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. येथे आपला उमेदवार मागे घेऊन अमित ठाकरे यांना पाठिंबा देण्याची खेळी खेळण्याची तयारी शिवसेना शिंदे गटाकडून सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. त्याबाबत येथील विद्यमान आमदार सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान सरवणकर यांच्याशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री चर्चा केल्याच वृत्त होते, पण आता सदा सरवणकर यांनी निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 MNS seventh list announced; Candidates given in Indapur, Parner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.