Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2024 02:54 PM2024-11-22T14:54:00+5:302024-11-22T14:58:01+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या येणार आहेत, त्याआधीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठका सुरू केल्या आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Narayan Rane criticized the Mahavikas Aghadi | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या २३ नोव्हेंबर रोजी समोर येणार आहेत. महाविकास आघाडी आणि महायुतीनेही विजयाचा दावा केला आहे. महाविकास आघाडीतील नेत्यांचे बैठकांचे सत्र सुरु आहे. मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीतील नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. दरम्यान, आता यावरुन भाजपा नेते खासदार नारायण राण यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. 'नवरीचा पत्ता नाही आणि हॉल घेतलाय, बॅडबाजा आलाय. सगळं आहे पण सत्ता कुठे आहे,'अशी टीका नारायण राणे यांनी महाविकास आघाडीवर केली. 

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आधी अजित पवारांच्या मुख्यमंत्रि‍पदाचा बॅनर लावला, पण काहीवेळातच काढला, कारण काय?

एबीपी माझा या वृत्तवाहिनीने खासदार नारायण राणे यांची विशेष मुलाखत घेतली. यावेळी राणे यांनी खासदार संजय राऊत, उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राणे म्हणाले, संजय राऊत यांनी शिवसेनेची वाट लावली. बाळासाहेब ठाकरे असताना १९९५ ला आम्ही सत्तेत गेलो. आता वर्चस्व कुठे आहे? थोड्या दिवसांनी उद्धव ठाकरे आणि आदित्या ठाकरे यांना रस्त्याने चालणे कठीण होईल, असा टोलाही राणे यांनी लगावला. 'आम्ही येतोय, येतोय हे सगळा दिखावा आहे. आता निकालाला काही तास शिल्लक आहेत, बघूया.  सत्ता स्थापनेची राऊतांना घाई लागली आहे. आमची महायुतीच सत्तेवर येणार आहे. भाजपाच्या सर्वात जास्त जागा असतील, असंही नारायण राणे म्हणाले. 

नारायण राणे म्हणाले, महाविकास आघाडीतील नेते एकत्र येतील का नाही हे माहित नाही. शरद पवार कोणत्या ट्रॅकवर जातात हे पाहिलं पाहिजे. शरद पवार कोणत्या क्षणी आमदारांच्या आणि राज्याच्या हिताचा निर्णय घेतील सांगता येत नाही. उद्धव ठाकरे फक्त दोनच दिवस मंत्रालयात गेले होते. महाविकास आघाडी जास्त काळ टीकणार नाही. यांच्यात विरोधी पक्ष नेता होईल असं कोणीही नाही, असंही राणे म्हणाले. संजय राऊत यांचे बोलणे म्हणजे लोकांच्या हिताचे नाही, ते सगळं वाईटच बोलत आहेत. ते त्यांच्या आयुष्यात संतुष्ट नाहीत. ते तुरुंगात जाऊन आले आहेत, अशी टीका राणे यांनी राऊतांवर केली. 

महायुतीमध्ये मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा दिल्लीत ठरेल

"राज्यात महायुतीचे सरकार येईल. शरद पवार कुठल्याही ट्रॅकवर जाऊ शकतात. महायुतीचे सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री दिल्लीत ठरला जाईल, असंही राणे म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Narayan Rane criticized the Mahavikas Aghadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.