Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:01 PM2024-10-21T16:01:35+5:302024-10-21T16:02:20+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून जागावाटपांसाठी बैठका सुरू आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Parivartan Mahashakti Aghadi announced the list of candidates | Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024:तिसऱ्या आघाडीची पहिली यादी झाली जाहीर; बच्चू कडूंसह या नेत्यांना उतरवले मैदानात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाली असून जागावाटपांसाठी बैठका सुरू आहेत. काल भाजपाने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत ९९ नावांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आज परिवर्तन महाशक्तीने पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत आमदार बच्चू कडू यांच्या नावाचाही समावेश आहे. 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तिसरी आघाडी सुरू करण्यात आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार बच्चू कडू यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली आहे. तिसरी आघाडी राज्यात २८८ जागा लढवणार असून आज पहिली यादी जाहीर केली आहे. अचलपूर, रावेर, ऐरोली, चांदवड, देगलूर, हिंगोली या जागांवर आपले उमेदवार जाहीर केले आहेत. 

विधानसभा नाही, लोकसभेवेळच्या एकमेकांवरील परोपकारावरून ठाकरे-काँग्रेसचे जागावाटप अडले? नेमके काय घडले...  

या यादीत शिरोळ आणि मिरज या जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात आल्या आहेत. पण या यादीत उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही, माजी खासदार राजू शेट्टी त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करुन नावांची घोषणा करणार असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे काल भाजपाने उमेदवारांची घोषणा केली, ऐरोलीतून गणेश नाईक यांच्या नावाची घोषणा केली त्यांच्याविरोधात तिसऱ्या आघाडीने अंकुश सखाराम कदम यांची उमेदवारी जाहीर केली आहे.

या उमेदवारांची केली घोषणा

ओमप्रकाश उर्फ बच्चू बा. कडू
मतदार संघ
४२ - अचलपूर
प्रहार जनशक्ती पक्ष

अनिल छबिलदास चौधरी
११ - रावेर यावल
प्रहार जनशक्ती पक्ष

गणेश रमेश निंबाळकर
११८ - चांदवड
प्रहार जनशक्ती पक्ष

सुभाष साबणे
९० - देगलूर बिलोली (SC)
प्रहार जनशक्ती पक्ष

अंकुश सखाराम कदम
१५० - ऐरोली
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

माधव दादाराव देवसरकर
८४ - हद‌गाव हिमायतनगर
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष

गोविंदराव सयाजीराव भवर
९४ - हिंगोली
महाराष्ट्र राज्य समिती

वामनराव चटप
७० - राजुरा
स्वतंत्र भारत पक्ष

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Parivartan Mahashakti Aghadi announced the list of candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.