Baramati Vidhan Sabha Election 2024 Results Live: हाय व्होल्टेज लढतीत शरद पवारांचे पाच शिलेदार पिछाडीवर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2024 09:58 AM2024-11-23T09:58:01+5:302024-11-23T13:04:23+5:30
Baramati Assembly Election 2024 Results Highlights: राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे.
NCP Sharad Pawar ( Marathi News ) : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून सुरुवातीच्या कलांमध्ये महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे. राज्यात हाय व्होल्टेज समजल्या जाणाऱ्या काही मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार सध्या तरी पिछाडीवर असल्याचं चित्र आहे. अजून मतमोजणीच्या अनेक फेऱ्या बाकी असून पवारांच्या उमेदवारांना विजयी होण्यासाठी आता अन्य फेऱ्यांमध्ये चांगली आघाडी घ्यावी लागणार आहे.
कोणत्या मतदारसंघात काय आहे स्थिती?
बारामती
तिसरी फेरी - अजित पवार : 9206
युगेंद्र पवार : 5007
तिसरी फेरी आघाडी टोटल : 4199
तिसऱ्या फेरीअखेर अजित पवार 11174 मतांनी आघाडीवर
शिरूर
माऊली कटके 8281
अशोक पवार 6303
इंदापूर विधानसभा मतदारसंघ
पहिल्या फेरी अखेर
पहिल्या फेरीतील मते दत्तात्रय
भरणे 4866
हर्षवर्धन पाटील 4530
प्रवीण माने 1250
दत्तात्रय भरणे 336 मतांनी आघाडीवर
कर्जत जामखेड
राम शिंदे आघाडीवर, रोहित पवारांना धक्का
राम शिंदे 541 मतांनी आघाडीवर.
आंबेगाव विधानसभा/पुणे
पाचवी फेरी अखेर
दिलीप वळसे पाटील १५०८ मतांनी आघाडीवर, देवदत्त निकम पिछाडीवर