Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2024 12:43 PM2024-11-17T12:43:12+5:302024-11-17T12:50:18+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : आज बारामतीमध्ये खासदार शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी अधिकाऱ्यांनी केली.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Scrutiny of Sharad Pawar's bags in Baramati Officials inspected the contents of the helicopter | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचार शेवटच्या टप्प्यात आला आहे. दरम्यान, खासदार शरद पवार यांच्या  प्रचारसभा दिवसभर होणार आहेत. तर दुसरीकडे निवडणूक अधिकाऱ्यांनी नेत्यांचे हेलिकॉप्टर आणि बॅगांच्या तपासणीचा सपाटा लावला आहे. आज खासदार शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी केल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन

काही दिवसापूर्वी सुरुवातील वणी येथील सभेच्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली होती. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओक ठाकरे यांनी फक्त विरोधी पक्षांच्या बॅगा न तपासता सत्ताधारी नेत्यांच्या बॅगाही तपासण्याचे आव्हान ठाकरे यांनी केले होते. यानंतर राज्यभरात अनेक नेत्यांच्या बॅगांची तपासणी केल्याचे व्हिडीओ समोर आले होते. दरम्यान, आता खासदार शरद पवार यांच्या बॅगांची तपासणी केल्याची बातमी समोर आली आहे. 

आज खासदार शरद पवार यांच्या पश्चिम महाराष्ट्रात सभा होणार आहेत. या सभांसाठी खासदार शरद पवार बारामती येथे पोहोचले, पवार हेलिकॉप्टरवर पोहोचताच निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगांची तपासणी केली. यावेळी शरद पवार बाजूला असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना सत्ताधाऱ्यांच्या बॅग तपासणीबाबत आव्हान केले होते, यानंतर राज्यभरात सत्ताधाऱ्यांसह विरोधी पक्षातील नेत्यांच्याही बॅगा तपासण्याचा सपाटा सुरु आहे. कोकणात दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बॅगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ समोर आला होता. 

२० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून २३ नोव्हेंबर रोजी निकाल समोर येणार आहेत. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती मोठी लढत होत आहे. माजी खासदार राजू शेट्टी, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती , आमदार बच्चू कडू यांनी तिसरी आघाडी सुरू केली असून राज्यात उमेदवार उभे केले आहेत. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Scrutiny of Sharad Pawar's bags in Baramati Officials inspected the contents of the helicopter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.