Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 10:19 PM2024-10-28T22:19:35+5:302024-10-28T22:21:09+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिवसेनेची तिसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 The third list of the shiv sena Shinde group was announced | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिंदे गटाची तिसरी यादी जाहीर, कन्नडमधून संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांना उमेदवारी जाहीर

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या अर्ज भरण्यासाठी शेवटचा दिवस आहे, या  पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तिसरी उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत १५ नावांचा समावेश आहे. कन्नड विधानसभेत संजना जाधव, बार्शीमध्ये राजेंद्र राऊत यांनी उमेदवारी देण्यात आली आहे. 

हातकणंगले विधानसभा मतदारसंघातून अशोकराव माने यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर मुंबाईवी विधानसभा मतदारसंघातून श्रीमती शायना मनीषा चुडासामा मुनोट यांनी उमेदवारी दिली आहे.

या नेत्यांना मिळाली संधी

सिंदखेडराजा - शशिकांत नरसिंगराव खेडेकर

घनसवांगी- हिकमत बळीराम उढाण

कन्नड- श्रीमती संजना जाधव

कल्याण ग्रामीण- राजेश गोवर्धन मोरे

भांडूप पश्चिम- अशोक धर्मराज पाटील

मुंबादेवी- श्रीमती शायना मनिष चुडासामा मुनोट

संगमनेर- अमोल धोंडीबा खताळ

श्रीरामपूर- भाऊसाहेब मल्हारी कांबळे

नेवासा- विठ्ठलराव वकीलराव लंघे पाटील

धाराशिव- अजित बाप्पासाहेब पिंगळे

करमाळा- दिग्विजय बागल

बार्शी- राजेंद्र राऊत

गुहागर -राजेंद्र रामचंद्र बेंडल

तर जनसुराज्यमधून

हातकणंगले- अशोकराव माने

राजश्री शाहुविकास आघाडी

शिरोळ- राजेंद्र शामगोंडा पाटील येड्रावकर

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 The third list of the shiv sena Shinde group was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.