Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2024 02:45 PM2024-11-14T14:45:17+5:302024-11-14T14:46:34+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केले.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Who will be the next Chief Minister in Mahayutti? Vinod Tawde told directly | Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महायुतीमध्ये पुढचा मुख्यमंत्री कोण होणार? विनोद तावडेंनी थेटच सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 ( Marathi News ) : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत.तर दुसरीकडे दोन्ही बाजूंनी सत्ता येण्याचा दावा करण्यात आहे. दरम्यान, भाजपा नेते विनोद तावडे यांनी महायुती पुन्हा एकदा सत्तेत येणार असल्याचा दावा केला असून मुख्यमंत्रिपदाबाबतही प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'लोकसभेला विशाल पाटील यांना मदत झाली, शिवसेनावाले क्षमा करा', भरसभेत बाळासाहेब थोरातांची कबुली

भाजपाचे नेते विनोद तावडे यांनी आज टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्रि‍पदाबाबत भाष्य केले. विनोद तावडे म्हणाले, मुख्यमंत्रि‍पदाबाबत निवडणुकीनंतर चर्चा करु असं पक्षामध्ये ठरले आहे. महायुतीमध्ये संख्याबळावर मुख्यमंत्रिपद असं काही ठरलेले नाही, निवडणुकीनंतर आम्ही यावर ठरवणार आहे. संख्याबळावर असं काही नाही, बिहारमध्ये आमचे आमदार जास्त आहेत पण आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री केले आहे. महाराष्ट्राचे हीत कशात आहे, ते लक्षात घेऊन आम्हाला मुख्यमंत्री करावा लागणार आहे, असं विनोद तावडे यांनी सांगितले. 

"भाजपा आणि शिवसेनेने मनसेसोबत काही जागांबाबत ठरले होते. पण शिवसेनेने माहीममध्ये उमेदवार देण्याचे ठरवले, असंही तावडे म्हणाले. 'आता राज्यात भाजपा ९५ ते ११० जागा घेईल. राष्ट्रवादी २५ ते ३० पर्यंत आणि शिवसेना ४०, ४५ ते ५० जागा घेईन महायुती १६० जागा घेईन, असंही विनोद तावडे म्हणाले. 

"हरयाणात काँग्रेसने एकाच समाजाचा विषय केला. त्यांच्याविरोधात छोटे, छोटे समाज एकत्र आले त्यामुळे आमचा विजय झाला, हरयाणामध्ये जसं सरकार आले तसेच महाराष्ट्रातही आमचेच सरकार येईल, असंही तावडे म्हणाले.

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Who will be the next Chief Minister in Mahayutti? Vinod Tawde told directly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.