Maharashtra Vidhan Sabha Election: 'मविआ'ला मोठा धक्का! काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव, भाजपाचे प्रसाद लाड विजयी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 10:58 PM2022-06-20T22:58:07+5:302022-06-20T23:04:37+5:30

Maharashtra Vidhan Sabha Election: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजपानं महाविकास आघाडीला धक्का देत आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election Congress Chandrakant Handore lost BJP Prasad Lad won | Maharashtra Vidhan Sabha Election: 'मविआ'ला मोठा धक्का! काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव, भाजपाचे प्रसाद लाड विजयी

Maharashtra Vidhan Sabha Election: 'मविआ'ला मोठा धक्का! काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंचा पराभव, भाजपाचे प्रसाद लाड विजयी

Next

Maharashtra Vidhan Sabha Election: राज्याच्या विधान परिषदेच्या निकालात मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. भाजपानं महाविकास आघाडीला धक्का देत आपले पाचही उमेदवार निवडून आणले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या पहिल्या पसंतीचे उमेदवार पराभूत झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. काँग्रेसचे दुसऱ्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप दुसऱ्या फेरी अखेर निवडून आले आहेत. 

भाजपाच्या पाचव्या उमेदवाराकडे म्हणजे प्रसाद लाड यांच्याकडे मतं नव्हती. तरीही प्रसाद लाड यांनी काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांपेक्षा अधिक मतं मिळवली आहेत. भाजपाला यावेळी राज्यसभा निवडणुकीपेक्षा जास्त मतं विधान परिषद निवडणुकीत मिळाल्याचं दिसून आलं आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी भाजपाला पहिल्या पसंतीची १२३ मतं मिळाली होती. यावेळी भाजपाला तब्बल १३३ पहिल्या पसंतीची मतं मिळाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची मतं फुटल्याची चर्चा सुरू आहे. यातच काँग्रेसचे ४४ आमदार असतानाही पहिल्या पसंतीची ४१ मतं काँग्रेस उमेदवाराला मिळाली. त्यामुळे काँग्रेसची ३ मतं फुटल्याचं उघड झालं आहे. तर शिवसेनेच्या ५४ मतांपैकी ५१ पहिल्या पसंतीची मतं शिवसेनेला मिळाली आहेत. म्हणजेच शिवसेनेचीही तीन मतं फुटली आहेत. 

दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड यांनी मारली बाजी
पहिल्या फेरीत भाजपाचे चार उमेदवार निवडून आले होते. तर दुसऱ्या फेरीत प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप, चंद्रकांत हंडोरे यांच्यात चुरस होती. यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत निवडून येण्यासाठीचा २६ मतांचा कोटा पूर्ण केला. तर भाई जगताप यांनाही २६ मतं मिळाली आहे. पण चंद्रकांत हंडोरे यांना २२ मतं पडली आहेत. 

कुणाला किती मतदान?
प्रवीण दरेकर (भाजपा)- २९ 
श्रीकांत भारतीय (भाजपा)- ३०
राम शिंदे (भाजपा)- ३०
उमा खापरे (भाजपा)- २७
प्रसाद लाड (भाजपा)- २८
एकनाथ खडसे (राष्ट्रवादी)- २९
रामराजे निंबाळकर (राष्ट्रवादी)- २८
आमश्या पाडवी (शिवसेना)- २६
सचिन अहिर (शिवसेना)- २६
भाई जगताप (काँग्रेस)- २६
चंद्रकांत हंडोरे (काँग्रेस)- २२ (पराभूत)

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Election Congress Chandrakant Handore lost BJP Prasad Lad won

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.