आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2024 01:09 PM2024-10-25T13:09:08+5:302024-10-25T13:10:02+5:30

Maharashtra Election Bycott:

Maharashtra Vidhan sabha Election: Hitherto the villages had boycotted, now the Pimpalner city itself boycotted on voting of Maharashtra Assembly Election 2024; why? | आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 

आजवर गावे बहिष्कार टाकत होती, आता शहरानेच मतदानावर बहिष्कार टाकला; का? 

शहरांमध्ये पैसा असल्याने शहरांचा सुकाळ आणि गावे बकाल अशी अवस्था महाराष्ट्रात अनेक ठिकाणी आहे. गावात जायला रस्ते नसतात, मातीच्या धुळीच्या, खड्ड्यांतून नागरिकांना ये-जा करावी लागते. विजेची सोय नसते, लाईट आली तर आली नाहीतर तिला वाली कुणीच नाही, असे अनेक प्रश्न कायमचेच असतात. यामुळे निवडणूक आली की गावे मतदानावर बहिष्कार टाकतात हे आजवर ऐकिवात होते. परंतू आता एका मोठ्या शहरानेच निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे शस्त्र उपसले आहे. 

साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहर व परिसरातील नागरिकांनी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रस्ताव एक मुखाने मंजूर करण्यात आला असून झोपलेल्या प्रशासनास जागे करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यावर पिंपळनेरकर ठाम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

गेल्या पाच वर्षांपासून पिंपळनेर शहरातील राष्ट्रीय महामार्ग 755 चे मुख्य रस्त्याचे काम प्रलंबित आहे. मोठ मोठे खड्डे व रस्त्याच्या कडेला मोठ्या गटारी खोदून ठेवलेल्या आहेत. पिंपळनेरकरांनी अनेक आंदोलने केली, रास्तारोको केले, आमरण उपोषणाला बसले. या रस्त्यावर शेकडो अपघात ही झाले. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. यासंदर्भात याचिकाकर्त्यांनी अतिक्रमण व हद्दी संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केली असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्व पिंपळनेरकरांना मंजूर आहे. परंतु गेल्या पाच वर्षांपासून जेटी पॉइंट ते सामोडे चौफुलीपर्यंतच्या रस्त्याची पुरती वाट लागली आहे.

या रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले असून धुळीमुळे व खड्ड्यांमुळे सर्व सामान्य जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत असल्याने पिंपळनेर व पंचक्रोशीतील शेकडो नागरिकांनी एकत्रित येऊन एकमताने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान न करण्याचा व बहिष्कार टाकण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे. जोपर्यंत रस्त्यांची दुरवस्था दूर होत नाही तोपर्यंत आम्ही पिंपळनेरकर कोणत्याही परिस्थितीत मतदान करणार नाही, असा कठोर निर्णय पिंपळनेरकरांनी घेतला आहे.

Web Title: Maharashtra Vidhan sabha Election: Hitherto the villages had boycotted, now the Pimpalner city itself boycotted on voting of Maharashtra Assembly Election 2024; why?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.