Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2024 02:19 PM2024-11-24T14:19:01+5:302024-11-24T14:23:31+5:30
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : विधानसभा निकालावर वकील असीम सरोदे यांनी शंका व्यक्त केली आहे.
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ( Marathi News ) : विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. राज्यातील २८८ विधानसभा जागांपैकी महायुतीने २३३ जागा जिंकल्या आहेत. तर महाविकास आघाडीला फक्त ४७ जागांवर विजय मिळाला आहे. भाजपने १४९ जागांवर निवडणूक लढवली, त्यापैकी १३२ जागांवर विजयाचा झेंडा फडकवला. या निकालावरुन आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. वकील असीम सरोदे यांनीही या निकालावर शंका व्यक्त केली आहे.
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
विधानसभा निवडणुकीच्या निकालावर वकील असीम सरोदे यांनी शंका व्यक्त केली आहे. वकील सरोदे यांनी टीव्ही नाईन या वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया दिली. असीम सरोदे म्हणाले, हा निकाल पूर्ण अनाकलनीय आणि अविश्वसनीय अशा स्वरुपाचा आहे. महाराष्ट्रातील लोक एवढा राक्षसी बहुमत चित्र नव्हत असं बोलत आहेत. तरीसुद्धा मत मिळाली आहेत, त्यामुळेच अविश्वसनीय आहेत. आता मतदान जेव्हा आम्ही करतो तेव्हा मत दिल्यानंतर ती प्रक्रिया पूर्ण झाली असं नाही. कायद्याच्या भाषेत सांगायचं तर जे मत मी दिलं ते मत तिथंपर्यंत पोहोचले का? मी दिलेलं मत त्या व्यक्तीपर्यंत पोहोचले तेव्हा ती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता हे सगळं शंकास्पद वाटत आहे. लोक कोणाला मतदान देत आहेत आणि कोणाला ते मिळत आहेत. याची शंका लोकांना वाटत आहेत. याबद्दलच्या साशंकता लोकांनी व्यक्त केल्या आहेत. प्रामाणिकपणे निवडणुका झाल्या नसतील तर त्या निवडणुकांना आव्हान दिले पाहिजे, असंही असीम सरोदे म्हणाले.
विधानसभेच्या पराभवावर पृथ्वीराज चव्हाणांनी दिली प्रतिक्रिया
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी आपल्या पक्षाचा पराभव धक्कादायक असल्याचे सांगितले आणि राज्याच्या विधानसभा निवडणुकीतील हा आतापर्यंतचा सर्वात वाईट पराभव असल्याचे म्हटले आहे.
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महिलांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेने ग्रामीण भागातील मतदारांना आकर्षित केले, तर ध्रुवीकरणामुळे राज्याच्या शहरी भागात विरोधी महाविकास आघाडीच्या संभाव्यतेला धक्का बसला. कराड दक्षिण मतदारसंघातून पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाला. यावर बोलताना चव्हाण म्हणाले की, लाट होती की छेडछाड हे सांगणे कठीण आहे.