महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2019 11:49 AM2019-11-04T11:49:48+5:302019-11-04T11:50:16+5:30

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपामध्ये सत्ता वाटपाच्या फॉर्म्युलावरून संघर्ष

Maharashtra Vidhan Sabha Result bjp offers revenue finance ministry to shiv sena | महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपाची शिवसेनेला 'अर्थ'पूर्ण ऑफर; 'मातोश्री'कडून सकारात्मक प्रतिसाद मिळणार?

Next

विधानसभा निवडणुकीच्या निकाल येऊन 10 दिवस उलटले असले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. विशेष म्हणजे राज्यातल्या जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिलेला असतानाही सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. मुख्यमंत्रिपदासह सर्व सत्तापदांचं समान वाटप, यावर शिवसेना ठाम आहे. तर भाजपा मुख्यमंत्रिपद सोडायला तयार नाही. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव वाढला. याच पार्श्वभूमीवर भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिल्याचं समजतं.

लोकसभा निवडणुकीवेळी ठरल्याप्रमाणे सत्तापदांचं समान वाटप व्हावं अशी मागणी शिवसेनेनं निकालापासून लावून धरली आहे. त्यामुळे अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद मिळावं यासाठी शिवसेना आग्रही आहे. त्यामुळे भाजपानं शिवसेनेला नवी ऑफर दिली आहे. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे राहील. मात्र मंत्रिमंडळात शिवसेनेला समान वाटा देऊ. याशिवाय अर्थ, महसूल मंत्रिपदही देऊ, असा प्रस्ताव भाजपानं दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे महत्त्वाची खाती स्वीकारून मुख्यमंत्रिपदावरचा दावा सोडणार का याकडे लक्ष लागलं आहे.

अहो आश्चर्यम्! संजय राऊत यांची पत्रकार परिषद भाजपावर टीका न करताच संपली

तत्पूर्वी इंडियन एक्स्प्रेनं भाजपाकडून शिवसेनेला देण्यात आलेल्या एका प्रस्तावाबद्दलचं वृत्त काल प्रसिद्ध केलं होतं. मुख्यमंत्रिपद भाजपाकडे, शिवसेनेला मंत्रिमंडळात समान वाटा, महत्त्वाची खाती असा उल्लेख भाजपाच्या प्रस्तावात होता. त्यावर मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिवसेनेला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात दोन अतिरिक्त मंत्रिपदं (एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री) दिली जावीत. पक्षाच्या दोन ज्येष्ठ नेत्यांची राज्यपालपदी नियुक्ती करण्यात यावी. याशिवाय राज्यातील सहकार क्षेत्रातल्या संस्थांमध्ये शिवसेनेचं 50 टक्के नियंत्रण असावं, अशा मागण्या उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्याचं वृत्तात म्हटलं होतं. 

'लग्न ठरवायच्या बैठकीतच जर एवढी भांडणं झाली तर पुढे संसार कसा नीट होणार?'

शुक्रवारी रात्री उशिरा फडणवीस यांनी एका मध्यस्थाच्या माध्यमातून उद्धव यांना हा प्रस्ताव देण्यात आल्याचं समजतं. या प्रस्तावाबद्दल उद्धव ठाकरे सकारात्मक असून त्यांनी फडणवीसांसोबत चर्चा करण्याची तयारीदेखील दर्शवली. त्यामुळे पुढील दोन दिवसात फडणवीस आणि ठाकरे यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे. याआधी भाजपानं शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपदासह 16 मंत्रिपदांचा प्रस्ताव दिला होता. तर भाजपा आणि महायुतीतल्या लहान पक्षांना 27 ते 29 मंत्रिपदं दिली जाणार होती. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result bjp offers revenue finance ministry to shiv sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.