महाराष्ट्र निवडणूक निकालः भाजपाला धक्का, पुण्यातील ८ जागांपैकी ३ जागांवर आघाडीचे उमेदवार पुढे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 10:30 AM2019-10-24T10:30:28+5:302019-10-24T10:33:08+5:30
Maharashtra Election Result 2019: भाजपा पुणे शहरात ४ जागांवर आघाडी आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार ३ मतदारसंघात आघाडीवर आहेत.
मुंबई - विधानसभा निवडणुकांचे निकालाचा पहिला कल हाती येत आहे. महायुतीला १८४ जागा तर महाआघाडी ८४ जागांवर आघाडी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या पुणे शहरात मागील निवडणुकीत भाजपाने सगळे मतदारसंघ जिंकले होते. मात्र यंदाच्या निवडणुकीत पहिल्या कलामध्ये भाजपा पुणे शहरात ४ जागांवर आघाडी आहे तर काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार ३ मतदारसंघात आघाडीवर आहेत.
कसबा विधानसभा मतदार संघ
भाजपाच्या मुक्ता टिळक - 21270 - आघाडीवर
काँग्रेस :- अरविंद शिंदे - 9438
मनसे :- अजय शिंदे - 2680
कोथरूड मतदार संघ
भाजप - चंद्रकांत पाटील - 20028 - आघाडीवर
मनसे - किशोर शिंदे - 9942
शिवाजीनगर मतदार संघ
भाजप - सिद्धार्थ शिरोळे - 8013
काँग्रेस - दत्ता बहिरट - 9033 - आघाडी
वडगाव शेरी मतदार संघ
भाजप - जगदीश मुळीक - 9003 -
राष्ट्रवादी - सुनील टिंगरे - 13432 - आघाडीवर