महाराष्ट्र निवडणूक 2019: दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2019 10:00 AM2019-10-30T10:00:16+5:302019-10-30T10:16:06+5:30

Maharashtra Election Result 2019: अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासाठी भाजपा, शिवसेनेत चढाओढ

Maharashtra Vidhan Sabha Result Independent MLA Kishor Jorgewar gives unconditional support to bjp | महाराष्ट्र निवडणूक 2019: दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

महाराष्ट्र निवडणूक 2019: दबावाचं राजकारण सुरूच; भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा

Next

मुंबई: सत्ता स्थापनेची चढाओढ, मुख्यमंत्रीपदासाठी दावे-प्रतिदावे सुरू असताना भाजपा आणि शिवसेना, भाजपामध्ये अपक्ष आमदारांच्या पाठिंब्यासाठी जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाला आणखी एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा मिळाला आहे. चंद्रपूरमधील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजपाला बिनशर्त पाठिंबा देत असल्याचं पत्र जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केलं आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि त्यांच्या नेतृत्वात स्थापन होणाऱ्या सरकारला मी बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो, असं आमदार किशोर जोरगेवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे. कालदेखील एका अपक्ष आमदारानं भाजपाला पाठिंबा दिला. गोंदियाचे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी भाजपाला पाठिंबा देत असल्याचं पत्र मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं.



गेल्या आठवड्यात विधानसभेचा निकाल जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी भाजपा, शिवसेनेत सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला नाही. सत्तेच्या समान वाटपावर शिवसेना ठाम आहे. त्याच पार्श्वभूमीवर सत्तेच्या वाटपासाठी होणाऱ्या चर्चेत आपला दावा बळकट करण्यासाठी शिवसेना, भाजपानं प्रयत्न सुरू केले आहेत. त्यामुळे अपक्ष आमदारांचा पाठिंबा मिळवण्यासाठी दोन्ही पक्षात स्पर्धा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

सत्ता स्थापन करण्यासाठी 145 आमदारांचा पाठिंबा आवश्यक आहे. सध्या भाजपाचे 105 आमदार आहेत. तर शिवसेनेचे 56 उमेदवार निवडून आले आहेत. प्रहारच्या बच्चू कडूंनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. तर आमदार रवी राणांनी भाजपाला पाठिंबा जाहीर केला आहे. याशिवाय इतर अपक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी भाजपा, शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. सरकार स्थापनेच्या चर्चेत आपलं पारडं जड ठरावं यासाठी दोन्ही पक्षांचे नेते सध्या कामाला लागले आहेत. 

Web Title: Maharashtra Vidhan Sabha Result Independent MLA Kishor Jorgewar gives unconditional support to bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.