पवारांची प्रांजळ कबुली ; पावसातील सभेचा राष्ट्रवादीला फायदाच झाला, पण... 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 01:08 PM2019-10-25T13:08:29+5:302019-10-25T13:33:51+5:30

Maharashtra Election Result 2019:सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला.

maharashtra vidhan sabha result : Pawar's confession of satara rally; The rally was beneficial to the NCP in election | पवारांची प्रांजळ कबुली ; पावसातील सभेचा राष्ट्रवादीला फायदाच झाला, पण... 

पवारांची प्रांजळ कबुली ; पावसातील सभेचा राष्ट्रवादीला फायदाच झाला, पण... 

Next

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचारसभांच्या झंझावाताची चर्चा राज्यभर चांगली रंगली. तसेच, पायाला जखमा असतानाही वयाच्या 80 व्या वर्षी शरद पवार पायाला भिंगरी लावल्यागत फिरत असल्याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. साताऱ्यातील लोकसभा पोटनिवडणुकीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत शरद पवारांनी चक्क मुसळधार कोसळणाऱ्या पावसात सभेला संबोधित केले. पवारांची ही सभा सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निर्णायक ठरली आहे. याबाबत शरद पवारांनी प्रतिक्रिया देताना, ती सभा फायद्याची ठरली, असंच म्हटलंय.

सातारा लोकसभा पोटनिवडणुकांममध्ये राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील आणि भाजपाचे उदयनराजे भोसले यांच्यात सामना रंगला. राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर उदयनराजे भोसलेंनी भाजपात प्रवेश केला. त्यानंतर, आपल्या खासदारकीचा राजीनामाही दिला होता. मात्र, साताऱ्यातील जनतेला उदयनराजेंचा हा निर्णय रुचला नाही. त्यामुळेच, श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली होती. शरद पवार यांनी शेवटच्या टप्प्यात श्रीनिवास पाटील यांच्यासाठी साताऱ्यात सभा घेतली. पवारांचं भाषण सुरू असताना साताऱ्यातील या सभेत मुसळधार पावसाने सभेला झोडपलं. त्यामध्ये पवारांवरही पावसाचा वर्षाव झाला. मात्र, निर्सगापुढेही नतमस्तक न होता, पवारांनी भरपावसात सभा घेतली. साताऱ्यासह महाराष्ट्रात पवारांच्या सभे क्लिप आणि फोटो व्हायरल झाले. तर, दिल्लीतही पवारांच्या सभेची चर्चा झाली. या सभेनंतर साताऱ्यात एक भावनिक वातावरण निर्माण झाले होते. त्याचाच, फटका उदयनराजेंना बसला. त्यामुळे, पवारांची साताऱ्यातील सभा निर्णायक ठरली. 
शरद पवार यांनी पावसातील सभेचा राष्ट्रवादी आणि काँग्रेसला लाभ झाल्याचं मान्य केलंय. माझी साताऱ्यात सभा सुरू असताना अचानक पाऊस सुरू झाला. त्यावेळी, समोरील लोकं डोक्यावर खुर्च्या घेऊन सभा ऐकत होती. त्यामुळे, मी सभेला संबोधित करणं हे माझं कर्तव्य होतं. म्हणूनच मी पावसात भिजत सभा घेतली. मात्र, ती सभा महाराष्ट्रभर चर्चेत येईल, असं मला वाटलं नव्हतं. पण, त्या सभेचे फोटो महाराष्ट्रभर झाले आणि त्याचा फायदा आम्हाला निवडणुकीत झाला, असं पवारांनी म्हटलंय. 
 

Web Title: maharashtra vidhan sabha result : Pawar's confession of satara rally; The rally was beneficial to the NCP in election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.