अवघा महाराष्ट्र होणार फुटबॉलमय; 'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 10:19 AM2017-09-15T10:19:54+5:302017-09-15T15:45:52+5:30

 भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.

Maharashtra will be football football; Chief Minister inaugurated the 'Maharashtra Mission 1-million' football game festival | अवघा महाराष्ट्र होणार फुटबॉलमय; 'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

अवघा महाराष्ट्र होणार फुटबॉलमय; 'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन' फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांनी केलं उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्दे भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत.शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उदघाटन झालं. आज बॉम्बे जीमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत.

मुंबई, दि. 15 : भारतात पुढील महिन्यात होणाऱ्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या वातावरण निर्मितीसाठी महाराष्ट्रात आज एकाच दिवशी 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी फुटबॉल खेळणार आहेत. शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता मुंबई जिमखाना, फोर्ट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते "महाराष्ट्र मिशन 1 -मिलीयन" या फुटबॉल खेळाच्या महोत्सवाचे उदघाटन झालं. आज बॉम्बे जीमखाना येथे आठ वेगवेगळे सामने होणार आहेत. मुंबई जिमखाना येथे मुलींचा संघ,मुलांचा संघ, मुंबईचे डबेवाले, क्रीडा पत्रकार विरुध्द राजकीय पत्रकार, नॅशनल ब्लाईंड असोसिएकशन विद्यार्थी, पालघर येथील आदिवासी संघ असे फुटबॉलचे सामने खेळले जाणार आहेत.

'महाराष्ट्र मिशन 1-मिलीयन'ला मिळालेला प्रतिसाद अभुतपूर्व असल्याचं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी म्हंटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017)  देशात 1कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली होती. त्या मिशनमधील महाराष्ट्राने आपला वाटा उचलत 10 लाख मुलं फुटबॉल खेळतील, अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं. मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा महोत्सव साकार झाल्याचा आनंद आहे. 'इ गॅझेटचा मोह टाळा- मैदानावर फुटबॉल खेळा', अशी थीम घेऊन या मॅचेस सुरू झाल्या आहे. मुंबईतील या महोत्सवाला मुंबईतील डबेवाले, अंधशाळेतील विद्यार्थी, आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थी, क्रीडा पत्रकार या सगळ्यांनी सहभाग घेतला आहे. मैदानावर येऊन समाजातील प्रत्येक घटकाला फुटबॉल खेळताना पाहण्याचा आमचा उद्देश साध्य झाल्याचं क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी म्हंटलं आहे.

 

मुंबई शहरात सुमारे जवळपास तीन लाखांहून अधिक मुले-मुली विविध ठिकाणी फुटबॉल खेळणार असून शाळा-महाविद्यालयांमधील मैदानांव्यतिरिक्त सुमारे 200 मैदानांची आखणी करण्यात आली आहे. त्यामुळे आज दिवसभर राज्यभरात मुले मुली फुटबॉल  खेळताना दिसणार आहेत. या महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर मुंबईच्या डबेवाल्यांनीही फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिफा अंडर 17 विश्वचषक स्पर्धेनिमित्ताने (FIFA U-17 World Cup India 2017)  देशात 1कोटी 10 लाख लोकांनी फुटबॉल खेळावे अशी कल्पना मांडली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या या आवाहनाला प्रतिसाद म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी "महाराष्ट्र मिशन1-मिलियन" ची घोषणा केली आहे. या घोषणेअंतर्गत आज राज्यभर 10 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी, युवक फुटबॉल खेळणार आहेत. अशा प्रकारचा अभिनव कार्यक्रम योजणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

मुलांनी इ-गॅझेट पासून दूर राहावे आणि मैदानावर येवून फुटबॉल खेळाचा आनंद लुटावा हा या उपक्रमामागे प्रमुख उद्देश आहे. त्यासाठी मुलांनी अधिक वेळ मैदानावर द्यावा यासाठीच फुटबॉल महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं आहे. तर  शिक्षण विभागाने 15 सप्टेंबर हा दिवस Non-Instructional Day दिला असल्यामुळे मोठया प्रमाणावर विद्यार्थी मैदानावर खेळायला किंवा खेळ पाहायला उपस्थित राहीले आहेत. मुंबईतील सुमारे २०० मैदांनावर फुटबॉलचे सामने खेळले जाणार असून त्यापैकी निवडक ठिकाणांची यादी खालीलप्रमाणे –

१.      ओव्हल मैदान

२.      क्रॉस मैदान

३.      मुंबई जिमखाना

४.      आझाद मैदान

५.      पोलीस जिमखाना, मरिन ड्राईव्ह

६.      पारशी जिमखाना, मरिन ड्राईव्ह

७.      इस्लाम जिमखाना, मरिन ड्राईव्ह

८.      विल्सन जिमखाना, मरिन ड्राईव्ह

९.      शिवाजी पार्क, दादर

१०.  कुपरेज मैदान

११.  गोवन्स स्पोर्टींग क्लब

१२.  कर्नाटक स्पोर्टींग क्लब

१३.  मुंबई स्कूल स्पोर्टस असोसिएशन

१४.  शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा

१५.  नायगांव पोलीस मैदान, नायगांव (फुटबॉल)

१६.  मुंबई विद्यापीठ, मरिन लाईन्स

१७.  महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, एलफिन्स्टन

१८.  जिल्हा क्रीडा संकुल, धारावी

१९.  प्रियदर्शनी पार्क, मलबार हिल

२०.  वरळी स्पोर्टस क्लब, वरळी

२१.  एम.डी.एफ.ए.सेंट झेविअर्स मैदान, परेल पू.
 

Web Title: Maharashtra will be football football; Chief Minister inaugurated the 'Maharashtra Mission 1-million' football game festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.