महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, भाजपाने शपथ घ्यावी - उद्धव ठाकरे

By admin | Published: February 11, 2017 08:23 PM2017-02-11T20:23:17+5:302017-02-11T21:04:00+5:30

हुतात्मा स्मारकात जाऊन भाजपावाल्यांनी पारदर्शकतेची शपथ घेतली ही त्यांची नौटंकी होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

Maharashtra will not let pieces fall, BJP should take oath - Uddhav Thackeray | महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, भाजपाने शपथ घ्यावी - उद्धव ठाकरे

महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही, भाजपाने शपथ घ्यावी - उद्धव ठाकरे

Next

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 11 -  हुतात्मा स्मारक येथे जाऊन भाजपा उमेदवारांनी घेतलेली पारदर्शकतेची शपथ म्हणजे केवळ नौटंकी असल्याचा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.  हिंमत असेल तर, महाराष्ट्राचे इंचभरही तुकडे पडू देणार नाही, अशी शपथ घ्या, असं आव्हानही उद्धव यांनी भाजपाला केले आहे.  
 
शिवाय, भाजपाच्या सभेत होणारी गर्दीही पारदर्शक आहे, भाजपाच्या सभांना कमी प्रतिसाद मिळत आहे,  असे म्हणत त्यांनी भाजपाची खिल्लीही उडवली.  
 
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी शनिवारी वडाळ्यामध्ये सभा घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपावर चौफर टीका केली.
 
उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे
 
खोटे बोलणारे मुख्यमंत्री राज्याला मिळाले हा शिवरायांचा अपमान- उद्धव ठाकरे
 
युती तुटली बरं झालं, नाही तर उल्हासनगरमध्ये कलानीच्या रांगेत माझा फोटो छापला गेला असता
 
कमळ कुठेही नुसता मळ आहे, मनातही मळ आहे, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला
 
मेट्रोच्या भूमिपूजनावेळी पंतप्रधानांच्या व्यासपीठावर जाण्याची इच्छा नव्हती  
 
भाजपाने मुंबईसाठी केले काय? 
 
हुतात्मा स्मारकात जाऊन भाजपवाल्यांची नौटंकी 
 
सगळीकडे मला भगवं वादळ दिसतंय
 
24 तारखेला एकच मथळा असेल, मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा 
 
शिवसैनिक एकवटतो तेव्हा समोरचा भुईसपाट होतो 
 
बाळासाहेब मला म्हणायचे, एकदा शब्द दिला की खाली पडू देऊ नको  
 
भाजपाच्या सभेत गर्दीही पारदर्शक, म्हणून लोक दिसत नाहीत
 
मुंबईची अब्रू काढणाऱ्याला ठेवणार नाही 
 
आश्वासन नाही वचन द्यायला बाळासाहेंबानी शिकवलं
 
पुढील सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणारच नाही, तर जिंकणारही
 
 
 

Web Title: Maharashtra will not let pieces fall, BJP should take oath - Uddhav Thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.