महाराष्ट्र लवकरच ऑक्सिजनमध्ये स्वयंपूर्ण असणारं देशातील पहिलं राज्य ठरणार; मुख्यमंत्री ठाकरेंचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2021 05:51 PM2021-08-10T17:51:57+5:302021-08-10T17:52:57+5:30
कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम ...
कोरोना प्रादुर्भावाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी प्रत्येक जिल्ह्याने ऑक्सिजन बाबत स्वयंपूर्ण व्हावे यासाठी युद्धपातळीवर काम सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिली आहे. महाराष्ट्र राज्य हे देशातील ऑक्सिजनच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणारे पहिले राज्य ठरेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. ते मीरा-भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
मीरा भाईंदर येथील ऑक्सिजन प्रकल्पाचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीनं लोकार्पण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे नगरसेवक इत्यादी नेते उपस्थित होते.
मागील कोरोना लाटेचा अनुभव पाहता येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेमध्ये कोणताही रुग्ण ऑक्सिजनपासून वंचित राहणार नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री ठाकरेंनी यावेळी व्यक्त केला.