देशी, विदेशीसह बीअरचाही झिंगाट!; मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2021 09:13 AM2021-12-26T09:13:05+5:302021-12-26T09:13:26+5:30

मुंबई शहरात २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये देशी दारूची विक्री १०७.११ टक्क्यांनी वाढली.

maharashtra wine beer liquor sell increased in 2021 after 2020 april to november | देशी, विदेशीसह बीअरचाही झिंगाट!; मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ

देशी, विदेशीसह बीअरचाही झिंगाट!; मद्यविक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ

Next

कोरोना काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व उद्योगधंदे बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिले होते. मात्र कोरोनाचा प्रकोप कमी झाल्यानंतर अर्थव्यवस्थेला हातभार लागावा, यासाठी वाईन शॉप सुरू करण्यात आले. त्यामुळे मद्यप्रेमींनी मोठ्या प्रमाणात दारू खरेदी केली. २०२१च्या एप्रिल ते नोव्हेंबरदरम्यान मुंबई शहर व उपनगरात मद्यविक्रीचे प्रमाण वाढले.

मुंबई शहरात २०२०च्या तुलनेत २०२१ मध्ये देशी दारूची विक्री १०७.११ टक्क्यांनी वाढली. तर, उपनगरात १०३.७७ टक्क्यांनी वाढली. शहरात विदेशी दारूची विक्री ३९.१९ टक्क्यांनी वाढली, तर उपनगरात ३१.९० टक्क्यांनी वाढली. बीअरची विक्री ५०.९१ टक्क्यांनी वाढली, तर उपनगरात ५१.८७ टक्क्यांनी वाढली. वाईनची विक्री शहरात ४९.३७ टक्क्यांनी वाढली तर उपनगरात ४६.८१ टक्क्यांनी वाढली.

देशीची विक्री वाढली 
लॉकडाऊनच्या काळात दारूविक्री काही प्रमाणात मंदावली होती. त्यानंतर दारू विक्रीस परवानगी दिल्यानंतर बीअर व विदेशी दारूच्या तुलनेत देशी दारूची विक्री अधिक झाली आहे. राज्यात देशी दारूची विक्री १६ टक्क्यांनी वाढली. तर शहरात व उपनगरात १०७ व १०३ टक्क्यांनी वाढली.

वाईनचीही गोडी लागली
विदेशी दारूच्या तुलनेत यंदा शहरात व उपनगरात वाईनच्या विक्रीत वाढ झाली आहे. शहरात व उपनगरात वाईन विक्रीची टक्केवारी अनुक्रमे ४९ व ४६ टक्क्यांनी वाढली आहे.

Web Title: maharashtra wine beer liquor sell increased in 2021 after 2020 april to november

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.