"भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार"; नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 05:26 PM2021-12-22T17:26:47+5:302021-12-22T17:27:49+5:30

Sachin Sawant : मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 

Maharashtra Winter Assembly Session 2021 : Congress Leader Sachin Sawant Slams BJP and Devendra Fadanvis on Narendra Modi Mimicry | "भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार"; नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा टोला

"भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार"; नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीचा व्हिडीओ शेअर करत सचिन सावंतांचा टोला

googlenewsNext

मुंबई : राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून पहिलाच पंतप्रधानांची नक्कल करण्यावरून मोठा गोंधळ उडाला. शिवसेना आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी बोलताना नरेंद्र मोदी यांची काही वाक्ये हिंदीत, नक्कल करून बोलली. त्यानंतर विरोधकांनी गोंधळ घालत भास्कर जाधव यांना माफी मागायला लावली.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेस नेते सचिन सावंत (Sachin Sawant) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला असून त्यामध्ये ते काँग्रेस नेते राहुल गांधी यांची नक्कल करताना दिसत आहेत. तसेच, मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत, असे म्हणत सचिन सावंत यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "विधानसभेत अंगविक्षेप केले असा आरोप करत शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी माफी मागावी अशी मागणी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांनी करून हक्कभंग आणण्याची धमकी दिली. मोदींचा आदर्श विसरलेल्या भाजपा नेत्यांच्या प्रबोधनासाठी मोदींचा संस्थेमधील कलाविष्कार सादर करत आहोत." दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदींवर टीका करताना डोळा मारला होता. तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली होती. 

काय आहे प्रकरण?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा उल्लेख करत राज्याचे मंत्री नितीन राऊत आणि आमदार भास्कर जाधव यांनी नक्कल केल्याने विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षाचे सदस्य चांगलेच भडकले. विधानसभेत नितीन राऊत यांनी एका विषयासंबंधी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढू, नागरिकांना 15-15 लाख रुपये देऊ असे आश्वासन दिले होते, असे वक्तव्य केले. मात्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाला आक्षेप घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी असे आश्वासन कधीही दिलच नव्हते, असा दावा फडणवीस यांनी केला. या लक्षवेधीशी पंतप्रधानांचा संबंध नसतानाही तो विषय काढणे हे आम्ही सहन करणार नाहीत,  असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यानंतर आमदार भास्कर जाधव उभे राहिले आणि म्हणाले, 2014 साली देशाचे पंतप्रधान होण्यापूर्वी नरेंद्र मोदी म्हणाले होते, काला धन लाने का है की नही लाने का… लाने का… लाने का है तो कहाँ रखने का.. यु ही रखने का..., अशा प्रकारे नक्कल करताना त्यांनी अंगविक्षेपही केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आक्रमक
भास्कर जाधवांनी सभागृहात पंतप्रधानांची नक्कल केल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी केली. सभागृहात भास्कर जाधव यांना निलंबित करा, अशा घोषणा सुरु झाल्या. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सभागृहात देशाच्या पंतप्रधानांची नक्कल सहन केली जाणार नाही. अंगविक्षेप करतायत ते सहन केले जाणार आहे का, ही पद्धत आहे का सभागृहाची? अंगविक्षेप करून भास्कर जाधव जे बोलतायत हे शोभनीय नाही. हे चालत नाही. आम्ही यांच्या नेत्यांचीही अशाच प्रकारे नक्कल केली. हे चालेल का सभागृहाला? त्यांनी माफी मागितली पाहिजे. 

भास्कर जाधव यांनी मागितली माफी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृह स्थगित करण्याची मागणी केली. त्यानंतर भास्कर जाधव यांनी उभे राहून, या सर्व प्रकरणावर माफी मागितली. भास्कर जाधव म्हणाले की, "मी ते पंतप्रधान असल्याच्या आधी बोललो आहे. पंतप्रधान झाल्यावर असं मी बोललो नाही. मी माझे शब्द मागे घेतो आणि अंगविक्षेप मागे घेतो."

Web Title: Maharashtra Winter Assembly Session 2021 : Congress Leader Sachin Sawant Slams BJP and Devendra Fadanvis on Narendra Modi Mimicry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.