Maharashtra Winter Session 2022: ठाकरे-शिंदे बनले सख्खे शेजारी; शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले २ भाग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 10:30 AM2022-12-19T10:30:42+5:302022-12-19T10:31:09+5:30

राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता.

Maharashtra Winter Session 2022: Shivsena Office divided in two parts one Eknath Shinde Group and Second Uddhav Thackeray Faction | Maharashtra Winter Session 2022: ठाकरे-शिंदे बनले सख्खे शेजारी; शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले २ भाग

Maharashtra Winter Session 2022: ठाकरे-शिंदे बनले सख्खे शेजारी; शिवसेनेच्या एकाच कार्यालयाचे बनले २ भाग

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात होत आहे. नागपूरात सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधाऱ्यांविरोधात विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. महागाई, बेरोजगारी आणि महापुरुषांचा अपमान यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांची कोंडी करणार आहेत. तर सत्ताधारीही विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहे. त्यात शिवसेनेच्या २ गटांमध्ये यंदाच्या अधिवेशनात पुन्हा वाद उफाळून येणार आहे. 

नागपूर हिवाळी अधिवेशनानिमित्त शिवसेनेचे ठाकरे-शिंदे गट दोन्ही आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्याचं कारण म्हणजे शिवसेनेचे कार्यालय कुणाला द्यायचे असा प्रश्न सगळ्यांना पडला होता त्यावर तोडगा म्हणून आता कार्यालयाचे २ भाग बनवण्यात आले आहे. त्यामुळे एकाच कार्यालयात शिंदे-ठाकरे गटाचे आमदार शेजारी शेजारी बसणार आहेत. 

राज्यात गेल्या जूनमध्ये सत्तांतर झाले. त्यानंतर मुंबईत झालेल्या विधिमंडळ अधिवेशनात देखील शिवसेनेचे कार्यालय शिंदे गटाला की ठाकरे गटाला यावरून वाद पेटला होता. ठाकरे गटाने कार्यालयावर ताबा मिळविला होता. नागपुरातही हाच प्रकार घडला. आपल्या आमदारांना बसण्यासाठी माझे कार्यालय आहे. आपल्या मंत्र्यांची देखील कार्यालय आहेत. त्यामुळे संघर्ष कशाला अशी समजूतदारपणाची भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या अधिवेशनात घेतली होती आणि वाद टाळला होता. तीच भूमिका यावेळी देखील ते घेतील, असं म्हटलं जात होतं. परंतु आता शिवसेनेच्या विधिमंडळ पक्ष कार्यालयाबाहेर २ पाट्या लावण्यात आल्या आहेत. 

शिंदे-ठाकरे गटात वादंग
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांपैकी ४० आमदार शिंदे गटात सहभागी झालेत. तर उर्वरित आमदार आजही उद्धव ठाकरेंच्यासोबत आहेत. त्यात विधिमंडळात अद्याप शिंदे गटाला मान्यता देण्यात आली नसल्याने कागदोपत्री उद्धव ठाकरे यांचा गटच अधिकृत मानला जातो. त्यामुळे ठाकरे गटाकडून शिंदे गटावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले की, १९९० पासून विधानभवन परिसरात शिवसेनेला जे कार्यालय दिले जाते तेच यावेळीही दिले गेले पाहिजे अशी आमची भूमिका आहे. या कार्यालयात आमचे कर्मचारी आजपासूनच रूजू झाले आहेत. कामकाज सुरू केले आहे. हे कार्यालय आमच्याकडेच राहील. शिंदे गटाला मोठे कार्यालय द्या, वाटल्यास महाल द्या पण आम्ही हे कार्यालय सोडणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. 
 

Web Title: Maharashtra Winter Session 2022: Shivsena Office divided in two parts one Eknath Shinde Group and Second Uddhav Thackeray Faction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.