महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी देशात अव्वल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2020 07:09 AM2020-09-25T07:09:34+5:302020-09-25T07:09:45+5:30

केंद्र शासनाचा अहवाल : वर्षभरात ‘पीजीआय’चा पटकावला पहिला ग्रेड

Maharashtra's academic performance tops the country! | महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी देशात अव्वल!

महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी देशात अव्वल!

googlenewsNext

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : देशभरातील शाळांचा कामगिरी अहवाल (परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स) केंद्र शासनाने जाहीर केला असून त्यात महाराष्टÑाने अव्वल स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे, लोकसंख्या आणि राज्याचा भौगोलिक आवाका लक्षात घेता महाराष्ट्राची शैक्षणिक कामगिरी अव्वल ठरल्याचे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.


नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे, यू-डायस प्लस, एमडीएम आणि शगुन पोर्टलच्या माध्यमातून शाळांची आकडेवारी गोळा करून पीजीआय इंडेक्स जाहीर केला जातो. त्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शिक्षकांची संख्या, अध्ययनाची अद्ययावतता, शाळेतील सोयी-सुविधा, प्रयोगशाळा, क्रीडांगण अशा ७० निकषांवर मूल्यमापन केले जाते. या आधारे एक हजार गुण दिले जातात. २०१७-१८ मध्ये महाराष्टÑाने ७०० गुण मिळविल्याने तिसऱ्या श्रेणीवर समाधान मानावे लागले होते. मात्र, २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात महाराष्टÑाने ८०० गुण मिळवून पहिली श्रेणी पटकाविली.

शिक्षकांच्या तुटवड्यावर शिक्कामोर्तब
शिक्षक, मुख्याध्यापक व पर्यवेक्षकीय यंत्रणेतील रिक्त पदे, त्यामुळे अध्यापन-पर्यवेक्षणाकडे होणारे दुर्लक्ष यातून अनेक राज्यांचा पीजीआय निर्देशांक कमी असल्याचे अहवालात म्हटले आहे. हजारपैकी ९५० गुण मिळविणाºया राज्यांचा समावेश पीजीआयच्या पहिल्या स्तरात केला जातो. मात्र, गेल्या दोन अहवालांपैकी एकदाही एकही राज्य पहिल्या स्तरात समाविष्ट होऊ शकले नाही.

Web Title: Maharashtra's academic performance tops the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.