देशात रस्तेनिर्मितीचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात - नितीन गडकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 02:52 AM2018-03-09T02:52:53+5:302018-03-09T02:52:53+5:30
देशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी म्हणाले की, देशात एक लाख तीन हजार ४२६ कोटी २८ लाख रूपयांच्या योजनांचे काम सुरू आहे. त्यात ७६ हजार ८५१ कोटी ७९ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे.
नवी दिल्ली - देशातील सगळ््यात जास्त रस्ते निर्मितीचे काम महाराष्ट्रात होत आहे, अशी माहिती गुरुवारी लोकसभेत एका प्रश्नाच्या उत्तरात रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. यावेळी गडकरी म्हणाले की, देशात एक लाख तीन हजार ४२६ कोटी २८ लाख रूपयांच्या योजनांचे काम सुरू आहे. त्यात ७६ हजार ८५१ कोटी ७९ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे.
खासदार ताम्रध्वज साहू यांनी राष्ट्रीय महामार्गांच्या निर्मितीवर किती पैसा मंजूर झाला व किती खर्च झाला असा प्रश्न विचारला होता. त्यावर गडकरी यांनी राज्यनिहाय रस्ते निर्मितीसाठी मंजूर व खर्च झालेल्या रकमेचा तपशील दिला. महामार्ग निर्मितीनंतर त्यांच्या देखभालीची जबाबदारीही निश्चित केली गेली आहे. महामार्ग आणि इतर मार्ग निर्मितीसाठी महाराष्ट्राला तीन हजार २२६ कोटी ८८ लाख रूपये मंजूर केले आहेत. त्यातील दोन हजार २५५ कोटी ६ लाख रूपयांचे काम पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.
राज्य मंजूर निधी खर्च झाले
(कोटी (कोटी
रुपये) रूपये)
महाराष्ट्र ३२२६.८८ २२५५.०६
आंध्र प्रदेश १६४५.४८ १४९८.७९
बिहार १८४८.१० १०२०.४४
गोवा ४००.०० ४००.२८
दिल्ली २.०० ००.००