महाराष्ट्राचे नशीब फळफळले! सीएसआरमध्ये सिंहाचा वाटा; गुजरात सोडा अन्य राज्ये कुठेच नाहीत...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:14 AM2022-12-12T10:14:35+5:302022-12-12T10:15:20+5:30
उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यातील कंपन्या या बाबतीत खूप मागे आहेत.
हरीश गुप्ता । लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांत कंपन्यांनी खर्च केलेल्या व्यावसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) अंतर्गत महाराष्ट्राला सिंहाचा वाटा मिळाला आहे. कंपन्यांनी १,२६,९४२ कोटी रुपये खर्च केले आणि महाराष्ट्राला १८,६०८ कोटी रुपये मिळाले. तर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यातील कंपन्या या बाबतीत खूप मागे आहेत.
कशासाठी वापरला निधी?
क्षेत्र रक्कम
(कोटीत)
शिक्षण, दिव्यांग, उपजीविका ८४०८.५१
आरोग्य, भूक निर्मूलन, ७०७१.७९
गरिबी, स्वच्छता
पर्यावरण, प्राणी कल्याण, १०४६.०६
संसाधनांचे संवर्धन
ग्रामीण विकास ९१५.८३
लैंगिक समानता, महिला ६१२.६
सक्षमीकरण, वृद्धाश्रम
खेळांना प्रोत्साहन देणे १९१.४९
अन्य १६४.६९
कला आणि संस्कृती १०५.९
अन्य क्षेत्रे ७०.६५
झोपडपट्टी विकास २०.२४
कुणाला किती?
२०१४-१५ ते २०-२१
राज्य रक्कम (कोटी)
महाराष्ट्र १८६०७.९६
कर्नाटक ७१६१.२
गुजरात ६२०४.५७
तामिळनाडू ५४४०.२२
आंध्रप्रदेश ५१०१.७१
दिल्ली ४०२६.०७
महाराष्ट्रातील खर्च
वर्ष रक्कम (कोटी)
२०१४-१५ १४४५.९२
२०१५-१६ २०२६.९
२०१४-१६ २४१४.७८
२०१५-१७ २७९७.४४
२०१४-१७ ३१४७.६८
२०१५-१८ ३३४८.७६
२०१४-१८ ३४२६.२८