देशात महाराष्ट्राचा डंका, पोलीस दलास ५७ पदके; शाैर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 12:41 AM2021-01-27T00:41:28+5:302021-01-27T00:41:44+5:30
राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते.
नागपूर : शाैर्यपूर्ण, विशेष उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण सेवा प्रदान करून महाराष्ट्राच्या पोलीस दलाने ५७ पदके मिळवून देशात अव्वल तीनमध्ये स्थान मिळवले आहे. सोबतच आपल्या गाैरवपूर्ण कामगिरीचा झेंडाही फडकावला आहे.
पोलिसांच्या कामगिरीचा देशपातळीवर राज्यनिहाय स्वतंत्र आणि सांघिक स्वरूपात तुलनात्मक आढावा घेऊन त्यांना विविध प्रकारची पदके प्रदान केली जातात. शाैर्यपूर्ण सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमजी), राष्ट्रपती पोलीस पदक (विशेष उल्लेखनीय सेवा) आणि पोलीस पदक (गुणवत्तापूर्ण सेवा) यासाठी ही पदके प्रदान करण्यात येतात. दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला ही यादी प्रसिद्ध केली जाते.
शौर्य पुरस्कार प्राप्त पोलीस अधिकारी अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयपीएस राजा, हरिबालाजी एन. पीएसआय नागनाथ पाटील, एनपीसी महादेव मडवी, कमलेश अर्का, गिरीश ढेकाळे, नीलेश धुमणे, कॉन्स्टेबल हेमंत मडवी, अमूल जगताप, वेल्ला अत्राम, सुधाकर मोगालीवार, बिएश्वर गेडाम आणि इन्स्पेक्टर गजानन पवार. याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभात कुमार, सुखविंदरसिंह, उपायुक्त निवृत्ती कदम आणि वरिष्ठ अधीक्षक विलास गंगावणे
राष्ट्रपती पदक यांना जाहीर
चीफ फायर ऑफिसर देवेंद्र पोटफोडे, संजय पवार, उपस्टेशन अधिकारी धर्मराज नाकोड आणि अग्निशामक राजाराम केसरी परमेश्वर नागरगोजे, अनिल खुले आणि बाळासाहेब नागरगोजे यांना जीवनरक्षक पदकाने सन्मानित करण्यात येणार आहे. तर हवालदार उत्तम गावडे, संतोष मणचेकर, बदन खांडेकर या तुरुंग प्रशासनातील कर्मचाऱ्यांनाही सन्मानित केले जाईल.
राष्ट्रपतींच्या हस्ते देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट सेवा पदकाचे ‘हे’ आहेत मानकरी...
सीआयएसएफच्या आयजी मीनाक्षी शर्मा, पुण्याचे सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, मुंबई क्राइम ब्रँचचे उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, भंडाऱ्याचे एसपी वसंत जाधव, दहशतवादविरोधी पथकाच्या अतिरिक्त आयुक्त कल्पना गाडेकर, ठाण्याच्या डेप्युटी एसपी संगीता शिंदे अल्फॉन्स