महाराष्ट्राने दिले सगळ्यात जास्त प्रेम
By Admin | Published: August 26, 2016 02:05 AM2016-08-26T02:05:54+5:302016-08-26T02:05:54+5:30
मराठी रंगभूमी ही खूप समृद्ध आहे. याच एका रंगभूमीवर सातत्याने नवे लिखाण होत असते.
मुंबई : मराठी रंगभूमी ही खूप समृद्ध आहे. याच एका रंगभूमीवर सातत्याने नवे लिखाण होत असते. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी कायमच मला प्रेम दिले, एवढे प्रेम दुसरे कुठूनच मिळाले नसल्याचे उद्गार ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दिन शाह यांनी व्यक्त केले.
नसिरुद्दिन शाह यांचे ‘अल्ल िळँील्ल डल्ली ऊं८’ इंग्रजी आत्मचरित्र पॉप्युलर प्रकाशनच्या वतीने ‘आणि मग एक दिवस’ या शीर्षकांतर्गत मराठी भाषेत प्रकाशित करण्यात येणार आहे. त्याविषयी मंगळवारी महालक्ष्मी चेंबर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ लेखिका सई परांजपे आणि रामदास भटकळ, अस्मिता मोहिते उपस्थित होत्या.
या वेळी शाह म्हणाले की, या आत्मचरित्राचा प्रवास तब्बल १२ वर्षे सुरू होता. आत्मचरित्रासाठी लिखाण करताना भावांसोबत बसून बऱ्याच गोष्टी आठवण्याचा प्रयत्न करायचो. आत्मचरित्राला अपेक्षेपेक्षा मिळालेला प्रतिसाद पाहून थक्क झालो. प्रत्येक घटनेबद्दल लिहिले नाही, मात्र मनात कुठलेही किंतु-परंतु न ठेवता लिखाण केले आहे.
आत्मचरित्राच्या अनुवाद प्रवासाविषयी सई परांजपे म्हणाल्या की, नसिरुद्दिन शाह यांनी दिलखुलासपणे लिहिले आहे. शिवाय, शाह यांच्या संपूर्ण प्रवासातील सहकलाकारांबद्दलही लिहिले आहे. त्यात ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी, अभिनेत्री शबाना आझमी, ज्योती सुभाष, सुलभा देशपांडे यांच्याविषयी आवर्जून लिहिले आहे. (प्रतिनिधी)
या बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी लॉग इन करा ६६६.’ङ्म‘ें३.ूङ्मे
लेखक, दिग्दर्शकांचे योगदान महत्त्वाचे
चित्रपट क्षेत्रातील प्रवासादरम्यान लेखक, दिग्दर्शकांचे योगदान जास्त महत्त्वाचे असल्याचे मत नसिरुद्दिन शाह यांनी व्यक्त केले. शिवाय, खूप चांगले सहकलाकार लाभले, मात्र त्यांवर कधीच अंवलबून राहिलो नसल्याचे त्यांनी सांगितले.