महाराष्ट्राचा स्वाभिमान अजून विकलेला नाही- विरेंद्र पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2019 03:44 PM2019-09-06T15:44:15+5:302019-09-06T15:56:43+5:30
निर्णय त्वरित मागे घेतला अन्यथा या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जातील असा सज्जड इशारा देखील विरेंद्र पवार यांनी दिला आहे.
मुंबई: महाराष्ट्राचा ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेले जवळपास २५ गडकिल्ले हॉटेल आणि लग्नसमारंभासाठी राज्य सरकार भाड्याने उपलब्ध करून देण्याचा महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर महाराष्ट्र मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक विरेंद्र पवार यांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
विरेंद्र पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले या गडकिल्ल्यांच्या विषयी संबंध भारतवर्षातील शिवप्रेमींनी श्रद्धा आहे, या पावन भूमीला वंदन करीत कित्येक पिढ्या ह्यातून स्फूर्ती घेतात. तसेच गड किल्ल्यांचे पावित्र्य टिकवण्याकरिता तमाम शिवप्रेमी किल्ल्यांवर कुठला ही अनुचित प्रकार घडून देत नाहीत, तसा दंडकच आहे. परंतु जरी कोणी समाजकंटकांनी दारू सिगारेट पिणे, युगुलानी प्रेमचाळे सारखे काही प्रकार केल्यास त्यांना तिथेच चांगलाच चोप दिला जातो. मात्र सरकार तर हॉटेल उघडून हिडीस संस्कृती व हनिमूनलाच समंती देत आहे. महसूल कमाईचा असला मार्ग सरकारने जरी शोधला असेल तरी महाराष्ट्राने अजून स्वाभिमान विकला नाही,अशी गर्जना करीत सरकारने जर हा निर्णय त्वरित मागे घेतला नाही तर अन्यथा या निर्णया विरोधात ठिकठिकाणी आंदोलन केली जातील असा सज्जड इशारा देखील विरेंद्र पवार यांनी दिला आहे.
धक्कादायक! ऐतिहासिक गडकिल्ले हॉटेल अन् लग्नसमारंभासाठी भाड्याने देण्याचा सरकारचा निर्णय @Dev_Fadnavishttps://t.co/TZdGzMNTFj
— Lokmat (@MiLOKMAT) September 6, 2019
तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने जे गड किल्ले पावन झाले आहेत व संबंध भारतवर्षातील शिवप्रेमी त्या गाद किल्ल्यांच्या भूमीला वंदतात, त्याच गड किल्ल्यांचा वापर हॉटेल,लग्नसमारंभ,करमणूक कार्यक्रम साठी वापरण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात चोहोबाजूंनी टीकेचा भडिमार होत आहे.सरकारच्या ह्या निर्णयामुळे सरकार त्यांच्या महसुलात वाढ करण्याकरिता आता ह्या थराला जाणार की काय असा सवाल विचारला जात आहे.