नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची - तावडे
By admin | Published: November 4, 2015 03:20 AM2015-11-04T03:20:21+5:302015-11-04T03:20:21+5:30
केंद्र शासनामार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक
मुंबई : केंद्र शासनामार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची
आहे. या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण अभिप्राय प्राप्त होतील, अशी अपेक्षा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.
उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर सिडनहॅम महाविद्यालय येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी तावडे बोलत होते. ते म्हणाले की, देशाचे नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना यंदा प्रथमच तळागाळापासून शिक्षणाचा विचार करण्यात आला आहे. फक्त उच्च व तंत्र शिक्षणच नव्हे, तर शालेय शिक्षणाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे नवीन धोरण शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने आणि पुढील युवा पिढीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.
शालेय शिक्षण विभागाचे धोरण ठरविताना राज्यभरातून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय पातळीवर कार्यशाळा, सादरीकरण आदी उपक्रम राबवून केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत सुचविलेल्या १८ प्रश्नांच्या आधारे माहिती
जमा करण्यात आली आहे.
हा अभिप्राय देशभरासाठी उपयोगी ठरणार आहे. नवीन शैक्षणिक
धोरण तयार करताना शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता धारण करणारे शिक्षक असा वेगळा विचार करण्याची गरज आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावरही भर देण्याबाबतचा विचार अपेक्षित आहे. याचा महाराष्ट्राचा नवीन विद्यापीठ कायदा यासाठीही उपयोग होणार आहे. सर्वंकष असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार असून, या परिषदेच्या माध्यमातून केंद्राला महत्त्वपूर्ण अभिप्राय देण्यासाठी सर्व शिक्षणतज्ज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)