महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेता हरपला

By admin | Published: December 3, 2014 03:38 AM2014-12-03T03:38:42+5:302014-12-03T03:38:42+5:30

इंदिराजींच्या पडत्या काळात त्यांना भक्कम साथ दिली. राज्यसभेत त्यावेळी ते काँग्रेसचा किल्ला समर्थपणे लढवत असत.

Maharashtra's secular leader Harpal | महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेता हरपला

महाराष्ट्राचा धर्मनिरपेक्ष नेता हरपला

Next

मुंबई : ९ फेब्रुवारी १९२९ रोजी जन्मलेले अंतुले पाच दशकांहून अधिक काळ सक्रिय राजकारणात राहिले. आमदार, खासदार, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री अशी त्यांची चढती राजकीय कारकीर्द राहिली. १९८० मध्ये ते मुख्यमंत्री झाले तेव्हा राज्यसभेचे सदस्य होते. विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते १ लाख ३० हजार मतांनी निवडून आले होते. महाराष्ट्रातील पहिले मुस्लिम मुख्यमंत्री बनण्याचा मान अंतुले यांना मिळाला, पण उक्ती आणि कृतीतून त्यांनी नेहमीच धर्मनिरपेक्ष प्रतिमा जपली. त्यांच्या अवतीभोवती कार्यकर्ते, विविध क्षेत्रातील लोकांचा मोठा गोतावळा असे. इंदिरानिष्ठ म्हणून त्यांची ओळख होती. १९६९ मध्ये काँग्रेस पक्षात फूट पडली तेव्हा ते इंदिराजींसोबत राहिले. इंदिराजींच्या पडत्या काळात त्यांना भक्कम साथ दिली. राज्यसभेत त्यावेळी ते काँग्रेसचा किल्ला समर्थपणे लढवत असत.

> वरदान ठरलेली ‘पोलिओ मोहीम’

तात्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघातून ते सलग दोन वेळा निवडून गेले. त्यांच्या या खासदारकीच्या काळात जून १९९५ ते मे १९९६ या काळात ते केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री होते. आरोग्य मंत्रिपदाच्या काळातील त्यांनी नवी पिढी पोलिओमुक्त करण्याचा विडा उचलला आणि देशात अमलात आणलेली ‘पल्स पोलीओ मोहीम’ ही वरदान ठरली.
च्आरोग्य मंत्रिपदाबरोबरच त्यांच्याकडे जलस्त्रोत मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार होता. १९९६ मध्ये ११व्या तर २००४ मध्ये १४व्या लोकसभेत देखील ते कुलाबा (रायगड) लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात अंतुले अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री होते. २००९ साली अंतुले यांनी लोकसभेची शेवटीची निवडणूक लढविली होती. त्यानंतर राजकारणापासून ते अलिप्त झाले होते.

>वादग्रस्त कारकिर्द

सिमेंटच्या मोबदल्यात इंदिरा गांधी यांच्या प्रतिभा प्रतिष्ठानला बिल्डरांकडून देणग्या घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला आणि याच सिमेंट प्रकरणामुळे अंतुले यांना मुख्यमंत्रिपदावरून पाय उतार व्हावे लागले होते. त्यानंतर १९८५ मध्ये ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले आणि १९८९ पर्यंत आमदार होते.
शहीद हेमंत करकरे यांच्या मृत्यूला मालेगाव बॉम्बस्फोटाच्या तपासाशी जोडल्याने अंतुले पुन्हा एकदा वादात पडले होते. २००९ मध्ये अंतुलेंनी शेवटची निवडणूक रायगडमधून लढवली. शिवसेनेचे अनंत गिते यांनी अंतुले यांचा पराभव केला़ त्यानंतर त्यांनी सक्रि य राजकारणातून संन्यास घेतला. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान पदास राहुल गांधी व नरेंद्र मोदी हे दोघेही योग्य नसल्याचे भाष्य केले होते.

Web Title: Maharashtra's secular leader Harpal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.